Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहावीचा अभ्यास आता यू-ट्युबवर

म.टा. प्रतिनिधी, नागपूर
मार्च २०१९ मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी यासाठी बालभारतीच्यावतीने विविध विषयांच्या तज्ज्ञांचे व्हिडीयो उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बालभारतीच्या संकेतस्थळावरील हे व्हिडीयो बघून विद्यार्थ्यांनी अभ्यासातील आपल्या शंका आणि चुका दूर कराव्या यासाठी या व्हिडीयोंची सुविधा विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात आली आहे.
२०१९-१९ या शैक्षणिक सत्रात दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून या अभ्यासक्रमावर आधारित पहिली परीक्षा मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी बालभारतीने सराव प्रश्नसंच तयार केले आहेत. हे प्रश्नसंच २६ नोव्हेंबरपासून पाठ्यपुस्तक मंडळाच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी हे प्रश्नसंच स्वत: सोडवावे आणि गरज पडल्यास शिक्षक किंवा मार्गदर्शकांची मदत घ्यावी असे बालभारतीने म्हटले आहे. ६ डिसेंबरपासून हे प्रश्नसंच यू-ट्युबवरही उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने अभ्यासक्रमाच्या कृतीपत्रिकांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडीयो तयार केला आहे. सर्व विषयांच्या कृतीपत्रिकांचा या व्हिडीयोत समावेश करण्यात आला आहे. हा व्हिडीयो यू-ट्युब वाहिनीवरही देण्यात आला आहे. यामध्ये, विविध विषयांच्या प्रश्नांच्या उत्तराबाबत विषयतज्ज्ञांचे मत व्यक्त करणाऱ्या व्हिडीयोंचा यामध्ये समावेश आहे.
कृतीपत्रिका तपासा
विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेची तयार करता यावी या दृष्टीने कृतीपत्रिका तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या कृतीपत्रिका सोडवावयाच्या आहेत. आपण सोडविलेल्या कृतीपत्रिका या बरोबर आहेत किंवा नाही हे तपासून बघण्याची संधी विद्यार्थ्यांना बालभारतीने दिली आहे. त्यासाठी संक्षिप्त उत्तरपत्रिका तसेच तज्ज्ञांचे त्या त्या विषयांचे व्हिडीयो बालभारतीने तयार केले आहेत. हे व्हिडीयो बघून आपल्या उत्तरपत्रिकांमधील चुका दुरुस्त करण्याची संधी देखील या व्हिडीयोजमुळे मिळणार आहे. अशा चुका दुरुस्त करून विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा अधिक सराव करावयास मिळणार आहे.
वाहिनीचे घ्या सबस्क्रिप्शन
सर्व विषयांचे व्हिडीयोज ६ डिसेंबरपासून क्रमश: उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे व्हिडीयो यू-ट्युबच्या इ-बालभारती वाहिनीवर पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यासाठी या वाहिनीवर सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. या वाहिनीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे अभिप्राय नोंदविण्याची सोय असणार आहे. विद्यार्थ्यांनी हे व्हिडीयोज बघावेत आणि त्यांबाबत आपले अभिप्राय देखील नोंदवावे असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी केले आहे.
असे आहे वेळापत्रक
सर्व प्रथम भाषा : ६ डिसेंबर
द्वितीय भाषा : ७ डिसेंबर
तृतीय भाषा : ८ डिसेंबर
विज्ञान १ : ९ डिसेंबर
विज्ञान २ : १० डिसेंबर
गणित १ : ११ डिसेंबर
गणित २ : १२ डिसेंबर
इतिहास व राज्यशास्त्र : १३ डिसेंबर
भूगोल : १४ डिसेंबर

Post a Comment

3 Comments

close