*💰७ वा वेतन आयोग वेतननिश्चिती- १९९९ बॅच विशेष🤝🏼*
*- महेश लबडे, संभाजीनगर*
यापूर्वी २०१० या वर्षीच्या बॅचने १ जुलै २०१६ हा विकल्प घेतला तर तसेच,२०११ यावर्षी नवीन नियुक्त तसेच २०१४ मध्ये कायम झालेल्या वस्तीशाळा शिक्षकांनी १ जुलै २०१७ चा विकल्प घेतला तर कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतो हे आपण पाहिले होते.
आता १९९९ मध्ये नियुक्त शिक्षक बंधू भगिनींसाठी महत्वाचे......!
सातवा वेतन आयोग फिक्सेशन व वेतन संरचनेच्या विकल्पाची निवड याबाबतची कार्यवाही सध्या सुरू आहे. यामध्ये आपण वेतननिश्चितीच्या विकल्प निवडीत केलेल्या एका छोट्याशा कृतीमुळे आपल्याला एक विशेष एक्स्ट्रा वेतनवाढीचा फायदा मिळणार आहे.
( ज्या शिक्षकांना २००१ ला केवळ वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली आहे, नंतर अजून पर्यंत कोणतीही पदोन्नती वगैरे झालेली नाही अशाच शिक्षकांसाठी)
*👍🏼सविस्तर माहिती खालीलप्रमाणे👇🏼 🤝🏼*
आपले १ जानेवारी २०१६ चे बेसिक
➡ १४३१०+४२००=१८५१०
आपले १ जुलै २०१६ चे बेसिक
➡१४८७० +४२००=१९०७०
आता,
जर आपण १ जानेवारी २०१६ हा वेतननिश्चितीचा विकल्प निवडला तर,
१८५१० × २.५७ = ४७५७०.७
याप्रमाणे आपले नवीन बेसिक Pay Matrix S-13 Level ११ प्रमाणे १ जानेवारी २०१६ ला ४७,६०० होईल.
व पहिल्या वेतनवाढी नंतर याप्रमाणे आपले १ जुलै २०१६ ला बेसीक ४९,००० होईल.
१ जुलै २०१७ ला बेसीक ५०,५०० होईल.
१ जुलै २०१८ ला बेसीक ५२,००० होईल.
अर्थातच १ जुलै २०१८ चे ५२,००० बेसिक हे आजचेही आपले बेसिक असणार आहे.
*परंतु,*
जर आपण खालील प्रमाणे *१ जुलै २०१६* हा वेतननिश्चितीचा विकल्प निवडला तर आपला आयुष्यभरासाठी खालीलप्रमाणे फायदा होईल!
१९०७० × २.५७ = ४९००९.९
याप्रमाणे आपले नवीन बेसिक Pay Matrix S-13 Level-13 प्रमाणे
१ जुलै २०१६ ला ५०,५०० होईल.
१ जुलै २०१७ ला ५२,००० होईल.
१ जुलै २०१८ ला ५३,६०० होईल.
अर्थातच १ जुलै २०१८ चे ५३,६०० बेसिक हे आजचेही आपले बेसिक असणार आहे.
म्हणजेच,
जर आपण १ जानेवारी २०१६ हा वेतननिश्चितीचा विकल्प निवडला तर, त्याप्रमाणे १ जुलै २०१८ ला आपले बेसिक असेल.... ५२,०००
परंतु,
जर आपण १ जुलै २०१६ हा वेतननिश्चितीचा विकल्प निवडला तर, त्याप्रमाणे १ जुलै २०१८ ला आपले बेसिक असेल.... ५३,६००!
*म्हणजेच आपण १ जुलै २०१६ हा वेतननिश्चितीचा विकल्प जर निवडला तर सध्या आपला थेट बेसिक मध्ये एक हजार सहाशे रुपयांचा (₹१६००) फायदा होतो, दिवसेंदिवस वाढत जाणारा महागाई भत्ता,घरभाडे भत्ता व बेसिक वरील इतर लाभ वेगळेच!*
फक्त या ठिकाणी एक लक्षात घ्यावे लागेल की आपल्याला १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीतील ७ वा वेतन आयोगाचा फरक मिळणार नाही! त्याउलट पुढील अडीच वर्षे आपले बेसिक वाढणार असल्याने पूर्वीच्या मिळणाऱ्या फरकापेक्षा अधिकचा फरक आपल्याला मिळणार आहे हाही आणखी एक फायदा होणार आहे.
तरी १९९९ च्या बॅचच्या ,ज्या शिक्षकांना अद्याप पर्यंत पदोन्नती वगैरे मिळालेली नाही, केवळ २००१ ला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली आहे, त्या सर्वांनी आवर्जून या संधीचा विचार करावा व योग्य तो निर्णय घ्यावा! तसेच इतरही सर्व शिक्षकांनी दोन्ही बेसिकला २.५७ मी गुणून Pay Matrix मध्ये विशेष लाभ होतोय का, याची खात्री करून घ्यावी.
*महेश लबडे*
*जिल्हा प्रसिद्धीप्रमुख*
*🚩महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,संभाजीनगर🚩*


0 Comments