Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यापीठ परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकसभा निवडणुकीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात येणार असून, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतील मतदान २३ आणि २९ एप्रिलला असल्याने २२ ते २४ एप्रिल आणि २८ ते ३० एप्रिल दरम्यान होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. परीक्षेचे नवे वेळापत्रक येत्या आठ दिवसांत विद्यापीठाच्या वेबसाइटवर लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान चार टप्प्यांत होणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा मार्चमध्ये संपणार असल्या, तरी विद्याापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्यावर मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांबाबत काय निर्णय होणार, याची विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकांमुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांमधील मतदान २३ व २९ तारखेला असल्याने २२ ते २४ एप्रिल, २८ ते ३० एप्रिल दरम्यान असलेल्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. त्याऐवजी नवीन वेळापत्रक पुढील आठ ते १० दिवसांत विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments

close