*सुधारित सातवा वेतन आयोग: शिक्षकांसाठी महत्त्वाचे!*
- *✒महेश पा. लबडे, संभाजीनगर*
_(सूचना: सदरील पोस्ट अधिसूचना, वित्त विभाग व ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय, मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी व जिल्हा परिषद संभाजीनगर येथे आयोजित सुधारित सातवा वेतन आयोगाच्या कार्यशाळा मार्गदर्शक लेखाधिकारी श्री प्रदीपजी बाहेकर यांच्याकडुन मिळालेल्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे.)_
सध्या सुधारित सातवा वेतन आयोगाची वेतननिश्चिती तसेच विकल्प देण्याची कार्यवाही राज्यभर सुरू आहे. राज्यातील सर्वात मोठा कर्मचारी संवर्ग असलेला शिक्षक संवर्गामध्ये सोशल मीडियातून सातवा वेतन आयोगा संदर्भात उलट-सुलट, चर्चा ,पोस्ट सुरू आहेत. काही पोस्ट मध्ये तथ्य आढळून येते तर काही पोस्ट मध्ये अर्धवट माहितीच्या आधारे, किंवा चुकीचा अर्थ लावून पोस्ट केल्या जातात. परंतु गेल्या महिनाभरापासून आम्ही या संदर्भाने वेगवेगळ्या संदर्भ शासन निर्णय, कार्यशाळा आदींच्या माध्यमातून शिक्षक संवर्गासाठी उपयुक्त होईल अशी माहिती देण्याचा या पोस्ट मधून प्रयत्न करणार आहोत.
सर्वप्रथम विकल्प देणे म्हणजे ठराविक दिवसापासून सुधारित सातवा वेतन आयोग स्वीकारणे हे लक्षात घेऊया.
*आता,विकल्प आपल्याला कसे देता येतात ते पाहूया...!*
जर आपला ग्रेडपे बदलला नसेल किंवा १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान पदोन्नती, वरिष्ठ वेतन श्रेणी , निवडश्रेणी आदी बदल झाले नसतील तर आपण वेगवेगळे विकल्प देऊ शकतो. यामध्ये सुधारित सातवा वेतन आयोग लागू झालेल्या दिनांकाचा, तसेच त्यानंतरच्या वेतनवाढीच्या दिनांकांचा विकल्प आपण देऊ शकतो. म्हणजेच आपण १ जानेवारी २०१६ व त्यानंतरच्या वेतनवाढीच्या दिनांक म्हणजेच १ जुलै २०१६,१ जुलै २०१७,१ जुलै २०१८....आदी विकल्प देऊ शकतो.
परंतु जर या मधल्या तीन वर्षांच्या काळात जर आपला ग्रेड पे बदलला असेल, वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती आदी बदल झालेले असतील तर दोनपैकी एकच विकल्प देऊ शकतो....हे दोन विकल्प म्हणजे एकतर सुधारित सातवा वेतन आयोग सुरू झाल्याचा दिनांक किंवा पदोन्नती, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी आदी लाभ मिळाल्याचा दिनांक... परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्यावे की जर यापैकी आपण दूसरा विकल्प म्हणजेच लाभ मिळण्याचा दिनांक विकल्प म्हणून निवडला तरी लाभ मिळाल्यानंतरच्या ग्रेड पेसहच्या मुळवेतनाला २.५७ ने न गुणता त्या दिवशीच्या जुन्याच ग्रेड पे सहच्या मूळ वेतनाला २.५७ ने गुनून अगोदर वेतन निश्चिती करून घेऊन पुढील कार्यवाही करावी लागेल. त्याबाबत खाली त्या मुद्द्यांमध्ये सविस्तर माहिती देत आहोत.
------------------:::::::::::::::::: ------------------
आता ज्यांचे गेल्या तीन वर्षांमध्ये ग्रेड पे बदलले नाही किंवा पदोन्नती ,वरिष्ठ वेतन श्रेणी ,निवड श्रेणी आदी लाभ घेतलेले नाही, त्यांनी विकल्प देताना आपल्या वेतननिश्चिती साठी फायद्याचा कोणता विकल्प ठरेल हे थोडक्यात समजून घेऊया....
आपले १जानेवारी २०१६ चे एकूण मूळवेतन × २.५७ करून येणारी रक्कम आपल्या पे मॅट्रिक्स मधील स्तरांमध्ये कोणत्या लेव्हलवर येते हे पहावे.
जसे की, (९२६०+२८००=१२०६०चे उदाहरण)
१२०६०×२.५७=३०९९४.२
३०९९४.२ ही रक्कम २८०० च्या S-10 मधील ३ र्या लेव्हलवरिल ३१,००० या टप्प्यावर बसते.
जर संबंधित शिक्षकाने १ जानेवारी २०१६ चाच विकल्प ठेवला तर त्या शिक्षकाला १ जुलै २०१६ ला वेतनवाढ मिळून त्याचे बेसिक S-10 मधील चौथ्या लेव्हलवरिल ३१,९०० या टप्प्यावर जाईल.
परंतु विकल्पाचा दुसरा पर्याय म्हणून जर संबंधितांनी १ जुलै २०१६ चा विचार केला तर,
(९६३०+२८००=१२४३०)
१२४३०×२.५७=३१,९४५.१
३१,९४५.१ ही रक्कम २८०० च्या S-10 मधील ५ व्या लेव्हलवरिल ३२,९०० या टप्प्यावर जाऊन बसते.
म्हणजेच या उदाहरणातील शिक्षकाला एक लेव्हलचा अधिकचा फायदा होऊ शकत असल्याने संबंधितांनी १ जुलै २०१६ हा विकल्प घेतल्यास निश्चितच फायदा होणार आहे.
काही शिक्षक या ठिकाणी असा विचार करत असतील की की ३१,९४५.१ ही रक्कम ३१,९०० या टप्प्यापेक्षा ४५.१ रुपयांनीच अधिक असल्याने वेतन वाढीच्या नवीन नियमानुसार पन्नासच्या आठ असल्याने ती अलीकडच्या टप्प्यावरील ३१,९०० मध्ये गृहीत धरावी लागेल. परंतु हा नियम फक्त वेतनवाढी साठीच आहे.जेव्हा सुधारित सातव्या वेतन आयोगाची पहिली वेतन निश्चिती करायची आहे, यावेळी विशिष्ट स्तरातील विशिष्ट लेव्हल वरील रकमेपेक्षा एक रुपयाही अधिक झाला असेल तर ती रक्कम थेट पुढील टप्प्यावर नेऊन ठेवावी लागते.
सर्व शिक्षकांनी, ज्यांचे गेल्या तीन वर्षांमध्ये ग्रेड पे बदलले नाही किंवा पदोन्नती ,वरिष्ठ वेतन श्रेणी ,निवड श्रेणी आदी लाभ घेतलेले नाही, त्यांनी अशाच प्रकारे आपला फायदा कशात होऊ शकेल हे हे याप्रमाणे व यापुढीलही वेतनवाढीच्या तारखांच्या (१ जुलै २०१७,१ जुलै २०१८) एकूण मूळ वेतनला २.५७ ने गुनून आपला फायदा होऊ शकेल का हे तपासूनच विकल्प देण्याचा विचार पक्का करावा. परंतु या ठिकाणी हे लक्षात घ्यावे कि आपण विकल्पा साठी जो दिनांक देऊ यापूर्वीचा सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील फरक संबंधिताला मिळणार नाही.
-------------------::::::::::::::::::::::: -------------------
आता १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यानच्या तीन वर्षांच्या काळामध्ये ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी ,निवड श्रेणी आदी ग्रेड पे मधील बदल झाले असतील असे लाभ घेतले असतील तर त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे दोन पैकी कोणता विकल्प द्यावा यावर विचार करू....
समजा जर एखाद्या शिक्षकाला ३ फेब्रुवारी २०१७ रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली असेल तर संबंधिताच्या दोन्ही विकल्पचा विचार करू....
जर त्याने १ जानेवारी २०१६ हा विकल्प निवडला तर-
समजा त्या शिक्षकाची या तारखेचे मूळ वेतन (१०८००+२८००=१३, ६००)असेल तर
१३६००×२.५७= ३४९५२
३४९५२ ही रक्कम S-10 मधील ८ व्या लेव्हलच्या ३५,९०० या रकमेवर जाते.
१ जानेवारी २०१६ चे मूळ वेतन- ३५,९००
१ जुलै २०१६ चे मूळ वेतन- ३७,०००
३ फेब्रुवारी २०१७ चे लगतपुर्वीचे मूळ वेतन-३७,०००
आता ३ फेब्रुवारी २०१७ रोजी संबंधित शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली असल्याने संबंधिताला S-10 मधून S-13 मध्ये स्थलांतरित करावे लागेल. या ठिकाणी एक लक्षात घ्यावे की वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी हा लाभ मिळालेला असेल तर एक वेतनवाढ दिली जात नाही.
आता ३७,००० ही रक्कम मध्ये S-13 कुठे बसू शकेल हे पाहून त्या सेलमध्ये फिक्स करावे.
S-13 मध्ये ३७,६०० हा टप्पा असल्याने ३७,००० ही रक्कम ३७,६०० या टप्प्यावर फिक्स करावी.
आता,
३ फेब्रुवारी २०१७ ला वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये वेतन संरचना स्तर बदलल्याने किमान सहा महिने वेतन वाढ मिळणार नाही. सातवा वेतन आयोगामध्ये १ जानेवारी व १ जुलै या वेतनवाढीसाठी दोन तारखा पैकी एक नियोजित केलेल्या असल्यामुळे या शिक्षकाला इथून पुढे प्रतिवर्षी १ जानेवारी याच दिवशी वेतनवाढी मिळत राहतील.
म्हणजेच संबंधिताचे आता S-13 नुसार,
३ फेब्रुवारी २०१७ चे मूळ वेतन- ३७,६००
१ जानेवारी २०१८ चे मूळ वेतन- ३८,७००
१ जानेवारी २०१९ चे मूळ वेतन-३९,९००
याप्रमाणे राहील.
परंतु जर या शिक्षकांनी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या लाभाच्या दिनांकाचा विकल्प निवडला असेल तर,
३ फेब्रुवारी २०१७ चे लगतपुर्वीचे मूळ वेतन-
११,२१०+२८००=१४०१०
१४०१० × २.५७ = ३६,००५.७
३६,००५.७ ही रक्कम S-10 मध्ये ९ व्या लेव्हल वरील ३७,००० मध्ये बसते.
आता या दिवशी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली असल्याने संबंधित शिक्षकाचा तर S-10 मधुन S-13 मध्ये घ्यावा लागेल.
म्हणून ३७,००० ही रक्कम S-13 मध्ये कोणत्या लेव्हलला बसते हे पे मॅट्रिक्स मध्ये पाहून फिक्स करावे.
S-13 मध्ये ३७,००० हा टप्पा नसल्याने लगतच्या ३७,६०० या टप्प्यावर फिक्स करावे.
३ फेब्रुवारी २०१७ चे मूळ वेतन- ३७,६००
इथेही सहा महिन्यानंतरच पुढील वेतन वाढ देणे शक्य असल्याने त्यानंतरची वेतनवाढीची तारखेला पहिली वेतन वाढ देता येईल. त्यानुसार,
१ जानेवारी २०१८ चे मूळ वेतन- ३८,७००
१ जानेवारी २०१९ चे मूळ वेतन-३९,९००
वरील आकडेवारीनुसार या शिक्षकांच्या बाबतीत लक्षात आले की दोन्ही पैकी कोणताही विकल्प निवडला तरी १ जानेवारी २०१९ चे मूळ वेतन ३९,९०० च येते.
परंतु दूसरा विकल्प जर निवडला तर उलट १३ महिने २ दिवसांचा सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील येणारा फरक मिळणार नाही.
म्हणून संबंधित शिक्षकाने निश्चितच १ जानेवारी २०१६ हाच विकल्प देणे आर्थिक दृष्ट्या योग्य राहील असे एकंदरीत वाटते.
( तरीही अशा गटातील प्रत्येकाने आपापले आकडेमोड करून विकल्प निवडावेत ही विनंती)
---------------------::::::::::::::::::::: ---------------------
आता १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान च्या काळात शिक्षकांना पदोन्नती मिळाली असेल तर त्यांच्या बाबतीतील विकल्पांच्या पर्यायाबाबत विचार करूयात....!
समजा एखाद्या शिक्षकाचे १ जानेवारी २०१६ चे मूळ वेतन (१०,८००+२८००=१३६००) असेल व संबंधिताला ३ ऑगस्ट २०१७ रोजी पदोन्नती मिळून त्याचे मूळ वेतन (११,६३०+२८००=१४,४३०) वरून (११,६३०+४२००=१५८३०) झाले असेल तर त्या शिक्षकाच्या विकल्पाच्या दोन्ही पर्यायावर विचार करूयात....
जर संबंधितांनी जानेवारी हा विकल्पाचा पर्याय दिला तर....
१ जानेवारी २०१६ चे मूळ वेतन- १३,६००
१३६००×२.५७= ३४९५२
३४९५२ ही रक्कम S-10 मधील ८ व्या लेव्हलच्या ३५,९०० या रकमेवर जाते.
१ जानेवारी २०१६ चे मूळ वेतन- ३५,९००
१ जुलै २०१६ चे मूळ वेतन- ३७,०००
१ जुलै २०१७ चे मूळ वेतन- ३८,१००
३ ऑगस्ट २०१७ रोजीचे लगतपुर्वीचे मूळ वेतन- ३८,१००
याच दिवशी पदोन्नती मिळाल्यामुळे संबंधित शिक्षकास पदोन्नतीची एक वेतनवाढ याच स्तरात द्यावी लागते.
३ ऑगस्ट २०१७ रोजीचे पदोन्नतीच्या वेतनवाढी नंतरचे मूळ वेतन- ३९,२००
आता पदोन्नती मिळाल्याने ग्रेड पे अर्थातच सुधारित वेतन आयोगातील सेल बदलून S-10 वरून S-13 मध्ये जाणार असल्याने ३९,२०० ही रक्कम या सेल मधील ज्या लेव्हलमध्ये बसेल त्या लेव्हलमध्ये फिक्स करावे.
३९,२०० ही रक्कम S-13 मध्ये ३९,९०० या लेव्हलला फिक्स होते.
३ ऑगस्ट २०१७ रोजीचे पदोन्नतीनंतरचे मूळ वेतन- ३९,९००
पुढील वेतनवाढीचा दिनांक- १ जुलै २०१८
१ जुलै २०१८ रोजी चे मूळ वेतन- ४१,१००
अर्थातच,
१ जानेवारी २०१९ चे मूळ वेतन- ४१,१००
आता संबंधित शिक्षकाने प्रत्यक्ष पदोन्नतीच्या लाभाच्या दिनांकाचा विकल्प दिला तर,
१ जानेवारी २०१६ चे मूळ वेतन- १३,६००
१ जुलै २०१६ चे मूळ वेतन- १४,०१०
१ जुलै २०१७ चे मूळ वेतन- १४,४३०
३ ऑगस्ट २०१७ रोजीचे लगतपुर्वीचे मूळ वेतन- १४,४३०
३ ऑगस्ट २०१७ रोजीचे फिक्सेशन पुढीलप्रमाणे होईल...
१४,४३० × २.५७ = ३७,०८५.१
३७,०८५.१ ही रक्कम S-10 मध्ये ३८,१०० या लेवलला बसते.
याच दिवशी पदोन्नती मिळाल्यामुळे संबंधित शिक्षकास पदोन्नतीची एक वेतनवाढ याच स्तरात द्यावी लागते.
३ ऑगस्ट २०१७ रोजीचे पदोन्नतीच्या वेतनवाढी नंतरचे मूळ वेतन- ३९,२००
आता पदोन्नती मिळाल्याने ग्रेड पे अर्थातच सुधारित वेतन आयोगातील सेल बदलून S-10 वरून S-13 मध्ये जाणार असल्याने ३९,२०० ही रक्कम या सेल मधील ज्या लेव्हलमध्ये बसेल त्या लेव्हलमध्ये फिक्स करावे.
३९,२०० ही रक्कम S-13 मध्ये ३९,९०० या लेव्हलला फिक्स होते.
३ ऑगस्ट २०१७ रोजीचे पदोन्नतीनंतरचे मूळ वेतन- ३९,९००
पुढील वेतनवाढीचा दिनांक- १ जुलै २०१८
१ जुलै २०१८ रोजी चे मूळ वेतन- ४१,१००
अर्थातच,
१ जानेवारी २०१९ चे मूळ वेतन- ४१,१००
वरील आकडेवारीनुसार या शिक्षकांच्या बाबतीत लक्षात आले की दोन्ही पैकी कोणताही विकल्प निवडला तरी १ जानेवारी २०१९ चे मूळ वेतन ४१,१०० च येते.
परंतु दूसरा विकल्प जर निवडला तर उलट १९ महिने २ दिवसांचा सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील येणारा फरक मिळणार नाही.
म्हणून संबंधित शिक्षकाने निश्चितच १ जानेवारी २०१६ हाच विकल्प देणे आर्थिक दृष्ट्या योग्य राहील असे एकंदरीत वाटते.
( तरीही अशा गटातील प्रत्येकाने आपापले आकडेमोड करून विकल्प निवडावेत ही विनंती)
---------------------::::::::::::::::::::: ---------------------
तरी अपेक्षा आहे की या पोस्ट मधून वेतन निश्चिती साठीच्या विकल्प निवडीची ची संकल्पना बऱ्यापैकी बहुसंख्य शिक्षक बंधू भगिनींना क्लिअर झाली असेल. तरी आपला जास्तीत जास्त आर्थिक लाभ व्हावा या सदिच्छांसह.....!
*🚩जय महाराष्ट्र!👍🏼*
*✒महेश पा. लबडे*
*जिल्हा प्रसिद्धीप्रमुख*
*🚩महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना संभाजीनगर🚩*
---------------------::::::::::::::::::::: ---------------------


0 Comments