*उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?, कधीकधी वाईट विचारांचाही करून पहा, कधीतरी उपवास आपल्या अहंकाराचा ही करावा, कधीतरी आपल्या 'मी' पणाचाही उपवास करून बघा, मनाला खूप शांती मिळते.*
*कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते, पंरतु कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकवून ठेवणे खूप कठीण असते.*
*ज्या वेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने पहाते आणि आदराने बोलते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे.*
*आयुष्यात आलेल्या एका दु:खामुळे आपण जर हताश होऊन बसलो, तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा.*
*आदर आणि चादर ह्या गोष्टी चुकीच्या माणसाला कधीच देऊ नये, नाहीतर आपण उघडे पडतो.*
*शरीर जितकं फिरत राहील, तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील, तेवढं शांत राहतं.*
*कुणासाठीही वेळ नसेल, इतकं व्यस्त होऊ नये,आणि कुणीही गृहीत धरावं, इतकं स्वस्त पण होऊ नये.*
*सुखी माणसाचा सदरा विकत मिळत नाही, तो आपल्यालाच शिवावा लागतो, 'आपल्या स्वभावाच्या मापाने आणि भावनांच्या धाग्यानी.'
💐💐💐💐💐💐💐💐
*IIमाणुसकी फाउंडेशनII*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


0 Comments