Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*महत्त्व योगाचं....*

*महत्त्व योगाचं....*
"""""""""""""""

*तरुणपणीच हल्ली माणूस*
*म्हाताऱ्यावानी दिसतं!*
*पोळ्या खातं कमी,*
*अन गोळ्या खातं जास्त!!!*

कधी तपासा लघवी
कधी तपासा रक्त!
योगासने केलीतर
होणार रोग मुक्त!!    

*आरोग्य असेल उत्तम*
*तर उत्साह राहील टिकून!*
*सूर्यनमस्कार , योगासनं* 
*लवकर घ्या शिकून!!* 

शरीराची शुद्धी क्रिया
करावीच लागेल!
नसता उगीच Acidity
जळजळ मागे लागेल!!

*जो पर्यंत तुम्ही योगासाठी*
*बाहेर नाही पडणार!* 
*हे दुखतं , ते दुखतं*
*दिवस रात्र रडणार!!*

शरीराची हालचाल बाबा
करावीच लागेल.....
नाहीतर चष्म्याआधी
कंबरेला बेल्ट लागेल!!

पन्नाशीतच गुडघे जर
होणार नसतील फोल्ड
काय करता अंगावरचं
दहा तोळे गोल्ड  ?

डॉक्टर म्हणतील गुडघ्याची
बदलून टाका वाटी !
नाहीतर घ्यावी लागेल
हाता मधे काठी!!

तुम्हीच सांगा रडकं तोंड
कुणाला आवडत असतं!
दुःखी , कष्टी माणसा जवळ
कुणीच बसत नसतं!!

प्राणायाम केल्यामुळे
चेहऱ्यावर तेज दिसेल
म्हातापरणी सुद्धा माणूस
हसत मुख दिसेल!

*DO  DAILLY YOGA*

      

Post a Comment

0 Comments

close