*शीर्षक- मला शाळेत बसू दे*
*हात जोडतो साहेब तुम्हा*
*मला शाळेत बसू दे*
*देवासारखा गुरुजी मला*
*रोज शाळेत दिसू दे...*
*पाटी दिली, पेन्सिल दिली*
*शब्द गिरवणार सांग कोण*
*डोसक्यात आमच्या बाराखडी*
*खोकून शिरवणार सांग कोण*
*चुकेल जेव्हा शब्द माझा*
*त्याला मजवर रुसू दे*
*देवासारखा गुरुजी मला...*
*वाट बघतोय फळा त्यांची*
*त्याला रंगवणार सांग कोण*
*भिंती झाल्यात अबोल इथल्या*
*शांती भंगवणार सांग कोण*
*गुणवत्ता जर खरंच हवी तर*
*त्याला कंबर कसू दे*
*देवासारखा गुरुजी मला...*
*नागरिक आम्ही भविष्यातले*
*आम्हा घडवणार सांग कोण*
*समोर ठाकल्या शत्रूंसमोर*
*आम्हा नडवणार सांग कोण*
*शिकवू दे त्याला मनाजोगे*
*इतर कामचं नसू दे*
*देवासारखे गुरुजी आम्हा...*
*कारकून केलाय गुरुजीस माझ्या*
*त्याला समजून घेणार कोण*
*तोच आमचा परीस आहे*
*त्याला उमजून घेणार कोण*
*तरीही कधीही रडला नाही*
*त्याला आमच्यात हसू दे*
*देवासारखा गुरुजी मला...*
*कवी-प्रसाद फर्डे*
*शहापूर,ठाणे*
*मो.७२७६४२४०९८*
0 Comments