*केस गळतीची कारणे व उपाय*
* एखादे मोठे आजारपण किंवा मोठ्या ऑपरेशननंतर, संक्रमित आजारामुळे, दिर्घ मुदतीच्या तापानंतर
* सतत चिंता-तणाव व काळजीमुळे.
* हार्मोन्ससंबंधी समस्या उदा. थायरॉइड, मासीक पाळीच्या समस्या.
* रक्त पातळ करणारे औषध, जादा व्हिटॅमिन 'अ' घेतल्याने. कुटुंब नियोजनाच्या गोळ्या घेतल्याने केसांच्या गळण्यात वाढ होते.
* केस रंगविण्यासाठी विविध केमिकल रंग वापरणे, विविध प्रकारच्या काळा रंग देणार्या मेंदी वापरणे, सतत केसांना जेल किंवा कंडिशनर वापरणे. केस धुण्याकरिता साबणाचा किंवा शांपुचा अतिरेकी वापर.
* आहारात लौह, व्हिटामिन्स, प्रोटिन कमी घेणे.
* केसांच्या मुळांचा रक्तपुरवठा कमी होणे, त्यांचे पोषण कमी होणे वा न होणे .
* सार्वदेहिक वा केसांच्या मुळाशी उष्णता वाढणे.
* रक्त कमी होणे, शरीरातील अस्थिपोषक अंश कमी होणे,
* कित्येकदा लोक आपल्या हाताने केस ओढतात किंवा सतत केस विंचरत राहतात, अशा व्यक्तींचे केस गळतात.
* फंगस - हा आजार फंगसाच्या संक्रमणामुळे होतो. यामुळे प्रभावित झालेल्या जागेवर खाज सुटते व तेवढी जागा लाल होते.
* चहा आणि कॉफी अत्याधिक प्रमाणात घेतल्याने केस गळतात.
* आंबट पदार्थ ( उदा. दही, लिंबू, इ. ) खारट पदार्थ, ( उदा. मीठ, लोणची ) यांचे अतिसेवन करणे, सतत जागरण वा मसालेदार पदार्थांचा वापर कायमस्वरूपी करणे, आहारातील असमतोलपणा यामुळे केस गळतात.
* केस ओले राहणे, केस गच्च बांधणे, केसांची स्वच्छता नीट न राखणे इ.
* गरम पाण्याने केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि कोरडे केस लवकर गळून पडतात.
* नशायुक्त पदार्थांचे सेवन, धुम्रपान यामुळे देखील केस गळतात.
* केस गळण्याचे एक मुख्य कारण म्हणजे तेलाचा वापर न करणे. काही लोकांना केसांना तेल न लावणे योग्य वाटते. सध्या तर काही तरुण लोक केसांना कधीच तेल लावत नाहीत. तसे ते लावले की ते चेहर्यावर उतरते म्हणून केसाला तेल लावणे टाळले जाते. पण तेल मिळाले नाही तर केस फार वेगाने गळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे.
* केस विंचरण्याच्या पद्धतीत सुद्धा काही वेळा दोष असतो. फार घासून केस विंचरू नये आणि त्यात जोरजोराने ब्रश फिरवू नये. तसा तो फिरवल्याने केसांची मुळे ढिली होतात. काही लोक केस वाळवण्यासाठी त्यांना घसाघसा पुसतात. तसे पुसण्याऐवजी त्यांना आपोआप वाळू द्यावे . केसांना शांपु करताना किंवा तेल लावताना केसांची खुप मालीश केली जाते किंवा केसांना घासले जाते यामुळे देखील प्रचंड प्रमाणात केस गळतात.
*केसांच्या आरोग्यासाठी काही उपाय*
* वर दिलेल्या माहीती प्रमाणे ज्या कारणाने केस गळत आहेत त्याचा त्याग करावा.
* शक्य असेल तर केसांना नियमित तेल लावावे. किवा आठड्यातून दोन वेळा तेल लावावे. तेल हे कोमट करुनच लावावे. तेल लावताना केसांना मालीश करु नये, जाड दाताचा कंगवा केसांमध्ये हळुवार पणे फिरवावा .
* शांपुचा अतिरेकी वापर टाळावा. स्त्रियांनी आठवड्यातून एक वेळा शांपु करावे, पुरुषांना केस धुण्यासाठी शांपू साबणाची गरजच नसते. शांपू वापरले तरी ते तांब्याभर पाण्यात विरघळुन नंतर त्या पाण्याने केस धुवावे, शांपु करताना ही केस जोर जोरात घासु नये.
* नियमित आहारात फळे-पालेभाज्या दुध-तुप यांचा समावेश असावा.
* शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यासाठी नियमित व्यायाम करावे.


0 Comments