Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कॉलेजमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे

पुणे: राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
शाळांप्रमाणेच आता महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्येही राष्ट्रगीत गुंजणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शिवजयंतीपासून होईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचे निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यास सर्वच महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सामंत यांनी पुढे नमूद केले.
चित्रपटगृह आणि राष्ट्रगीताचे वाद
दररोज १५ लाख लोक म्हणतात राष्ट्रगीत
महाराष्ट्रात आजघडीला दररोज किमान १५ लाख लोक राष्ट्रगीत म्हणतात. मला वाटतं इतक्या मोठ्या संख्येने राष्ट्रगीताचा जागर करणारं देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल, असेही सामंत म्हणाले.

Post a Comment

0 Comments

close