Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चतुर्थश्रेणी कर्मचारी शासन निर्णयावर आधारित कविता - शासन निर्णय आला, शिपाई मामा दूर झाला.



*शासनाचा निर्णय झाला..!*
 *-////////////////////////////////////-*

  *शासनाचा निर्णय झाला..!*
  *आणि शाळा शाळांमधील.*
  *भविष्यातील शिपाई मामा.*
  *नेमणुकीपासून दूर झाला.*

  *खरतर शिपाई मामा..*
  *असतोच शाळेची शान..*
  *रोज सकाळी शाळेतील*
  *स्वच्छता करतो तो छान..*

  *त्याच्याच बेलने शाळेची..*
  *सुरुवात होते महान..*
  *साहेबांपासून मुलांपर्यंतचा*
  *तो मित्र असतो छान...*

  *शाळेच्या कार्यक्रमाची..*
  *शोभा वाढवितो मामा...*
  *मात्र सत्कार समारंभावेळी.*
  *सन्मानात कायम रिकामा*

  *लहानबाळांच्या दुःखाने..*
  *तो लगेच व्याकुळ होतो..*
  *शाळेपासून घरापर्यतचा..*
  *उत्तम दोस्त बनून जातो...*

  *भुकेने व्याकुळलेल्यासाठी.*
  *तो स्वतःचा डबा देतो...*
  *टेन्शन आलेल्या साहेबांचा*
  *तोच नेहमी आधार बनतो..*

  
*सर्व फाईली.. सर्व टॅग..*
  *तोच व्यवस्थीत जपतो..*
  *काहीवेळा निर्णयातही..*
  *तो आधार बनून जातो..*

  *तोच भविष्यातला मामा...*
  *आता दिसणार नाही..*
  *साहेबांसहित स्टाफचा..*
  *आधार उरणार नाही...*

  *असा तुमचा आमचा सखा*
  *नेमणूकित असणार नाही..*
  *ख-या अर्थाने शाळेची शान*
  *पुन्हा आता दिसणार नाही.*

  *तो शाळेत दिसण्यासाठी.* 
  *निर्णय बदलला पाहिजे...*
  *शिपाईमामा नेमला पाहिजे*
  *आधारवड जगला पाहिजे.*
   
  *यासाठी सर्व संघटना...*
  *जीवंत असल्या पाहिजेत..*
  *अन्याया विरुद्ध लढण्या..*
  *त्या पुढे आल्या पाहिजेत..*

  *एवढंच बाकी काय...?*

  *शब्दरचना..*🌷
  *प्रभातकवी..*🌹
  *श्री.यशवंत आ.गायकवाड*
  *अध्यक्ष,*
  *सातारा जिल्हा माध्यमिक*
  *शिक्षक संघ,सातारा..*
  *(टी.डी. एफ संलग्न..)*
   *मो.नं.१)७९७२६९८४६४..*
           *२)८०८७२६१३५३..*

Post a Comment

0 Comments

close