मागील महिन्यात इंडोनेशिया येथे झालेल्या 'इंटरनॅशनल सायन्स इन्वेन्शन फेअर' या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत या दोघींना रौप्य पदक मिळाले आहे. जगभरातून चाळीस देशांमधून साडेतीनशेपेक्षा जास्त प्रोजेक्ट या स्पर्धेत सहभागी झाले होते. सध्या इंडोनेशियाला जाणे शक्य नसल्याने तिथल्या परीक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने या दोघींच्या प्रोजेक्टचे परीक्षण केले. त्यात या दोघींनी यश संपादित केले आहे.
आठवीत शिकणाऱ्या त्या दोन मुली म्हणजे गायत्री बेडेकर आणि अमृता बापट. या मुलींनी घरबसल्या सायकलिंग करता करता मोबाईल किंवा बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू चार्ज करता येतील असे मॉडेल बनविले आहे. गायत्री आणि अमृता यांनी सायकलिंग करुन फिट राहण्यासोबतच मोबाईल चार्ज करुन वीज वाचविण्याकडे देखील लक्ष वेधले आहे. बरेच जण जिममध्ये जावून सायकल चालवितात. तेथेही हे मॉडेल बसवून मोठ्या प्रमाणात वीज बचत करता येईल. नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी जिथे विज उपलब्ध नसते अशा ठिकाणी या मॉडेलचा सर्वात जास्त उपयोग होवू शकतो, आणि हाच आमचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे दोघीही सांगतात.
कसे तयार केले हे मॉडेल?
सुमारे २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे हँडप्रेस मशिनवर बनवायचे.
त्याला एक चुंबक असलेली मोटार जोडायची.
हवे ने पंखा फिरला की विज तयार होईल. करंट आपल्या मोबाईलच्या गरजे नुसार रेग्युलेट करायचा.
आणि त्याला एक यु एस बी USB PORT सॉकेट जोडायचे. हे सगळे एका सिल्ड खोक्यात बसवायचे (पाणी जाऊ नये म्हणून).
आता वार्याने उर्जा देणारा मोबाईल चार्जर तयार. हा चार्जर एका क्लिप ने सायकलला जोडायचा.
जे लोक सायकलवर लाँग ट्रिप्स करतात त्यांना या चार्जरची महती लगेच लक्षात येईल!
कारण स्ट्रावा किंवा कोणताही अॅप जिपिएस वापरून बॅटरी खातो. त्याला अशी चार्जरची जोड दिली तर अधिक काळ मोबाईल चालू राहील.




0 Comments