Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सचिन तेंडुलकरकडून रणजितसिंह डिसले गुरुजींचं विशेष कौतुक...

'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार (global teachers prize award) प्राप्त केल्यानंतर दिग्गजांकडून रणजितसिंह डिसले Ranjitsinh Disale गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
         आता मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनं यांनी डिसले गुरुजींना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई: युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. या पुरस्कारानंतर दिग्गजांकडून डिसले गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरनं डिसले गुरुजींना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्यात शिक्षण ही सर्वात मौल्यवान भेट आहे. शिक्षण क्षेत्रात विशेषत: मुलींना शाळांमध्ये परत येण्यास मदत केल्याबद्दल आणि ग्लोबल टीचर प्राईझ जिंकल्याबद्दल डिसले यांचं अभिनंदन असं सचिननं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सचिननं या ट्वीटमध्ये डिसले गुरुजींचा अवार्ड जिंकल्यानंतरचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

हे ही वाचा


जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काढले. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सोलापूरसारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने हा पुरस्कार मिळविला ही खरच अभिनंदनीय बाब आहे. या शाळांमधील काम उत्तम आहे याचा दाखला या पुरस्काराच्या रुपाने मिळाला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.

Post a Comment

0 Comments

close