जिल्हांतर्गत बदल्या खो-खो पद्धतीनेच होणार.... शाळांनिहाय रिक्त जागा कशा घोषित केल्या जातील पहा.
जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 18 जून 2024 चा शासन निर्णय पहा. - Click Here
आंतरजिल्हा बदली 23 मे 2023 चा शासन निर्णय पहा. Click Here
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती घोषित करतील. सदर कार्यवाही करित असताना प्रथमतः मा. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र 3278/2010 बाबत दि. 13.09.2012 व दि. 21.10.2012 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी/नक्षलग्रस्त/पेसा क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो सम प्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा व सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांच्या जागा रिक्त दाखविण्यात येतील. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे त्या जागा दाखविण्यात येतील. म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र असणाऱ्या सर्व शिक्षकांच्या जागा रिक्त दाखवल्यामुळे संवर्ग १, २ व ३ मधील शिक्षक त्यांच्या जागा मागू शकतात. म्हणजेच बदल्यातील खो-खो पद्धत पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
जिल्हांतर्गत बदली शासन निर्णयातील संपूर्ण मुद्द्यांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे टच करा.
समानीकरणातून ज्या शाळांमध्ये रिक्त जागा ठेवायच्या आहेत त्या शाळांची व निव्वळ रिक्त जागा असलेल्या शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून जाहीर करण्यात येईल.
समाणीकरन धोरण कसे राबविले जाईल पहा.
शिक्षकांच्या बदल्या करित असताना समानीकरणांतर्गत रिक्त जागांवर कोणालाही बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही.
0 Comments