Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्टाफ पोर्टलवर अशी नोंदवा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती How to fill vaccination information of teaching and non teaching staff on staff portal?

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती स्टाफ पोर्टलवर कशी नोंदवावी? How to fill vaccination information of teaching and non teaching staff on staff portal? 


कोविड १९ संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्याबाबत शासनाच्या आदेशान्वये निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी मागविण्यात येत आहे. त्यानुषंगाने सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सरल प्रणाली अंतर्गत स्टाफ पोर्टल मध्ये केंद्र प्रमुख लॉगीनला देण्यात आली आहे. त्यानुसार, खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

कोविड लसीकरण न झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबविणेबाबत... 

१) आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इ. १ ली ते इ. १२ वी च्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या एक - दोन मात्रा पूर्ण झाल्याबाबतची माहिती केंद्र प्रमुख लॉगीनवरून स्टुडंट पोर्टलमध्ये नोंदविण्याबाबत संबंधितास आपल्या स्तरावरून निर्देशित करावे.

१.१ केंद्र प्रमुख व शहरी भागात संबंधित अधिकाऱ्यांच्या लॉगीनला संबंधित केंद्रातील व भागातील सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती नोंदविण्याची व अद्ययावत करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

१.२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या एक मात्रा/ दोन मात्रा पूर्ण झाल्याबाबतची माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्यात यावी. शाळामधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर याबाबतची संबंधित शाळेची माहिती सातत्याने अद्ययावत करण्यात यावी.

Student Portal - How to assign class teacher? वर्गाला वर्ग शिक्षक कसे नियुक्त करावेत? PDF / Video पहा.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती नोंदविण्याची/ अद्ययावत करण्याची प्रक्रिया टप्पे step by step Guide. 

कोविड लसीकरण न झालेल्या शिक्षकांचे माहे नोव्हेंबर चे वेतन थांबविणेबाबत... 

Step 1 - Login


https://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्टाफ पोर्टलमध्ये केंद्र प्रमुख, मनपा क्षेत्रात क्षेत्रिय अधिकारी व न.पा. क्षेत्रात प्रशासन अधिकारी यांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगीन करावे.

Staff Portal Direct Login page 

https://edustaff.maharashtra.gov.in/Education/users/login


Step 2 - Vaccination Tab


स्टाफ पोर्टलमध्ये केंद्र प्रमुख म्हणून लॉगीन केल्यानंतर Vaccination या टॅब वरती क्लीक करावे. 

Step 3 - Select School


तद्नंतर लिस्ट ऑफ स्कूल वर क्लीक करून ज्या शाळेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवायची/अद्ययावत करावयाची आहे ती शाळा निवडण्यात यावी.

Step 4 - Fill Details of teaching and non teaching staff



1) उक्त शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मंजूर पदसंख्या नोंदवण्यात यावी. तदनंतर उक्त शाळेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कार्यरत पदसंख्या नोंदवण्यात यावी.

2) तदनंतर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या नोंदविण्यात यावी आणि त्यानंतर लसीकरणाची फक्त एक मात्रा पूर्ण झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची संख्या नोंदविण्यात यावी.

NAS Exam विषयी संपूर्ण माहिती, निवडलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. 

Step 5 - Save


वरीलप्रमाणे माहिती नोंदवून पूर्ण झाल्यानंतर उक्त माहिती योग्य असल्याची खात्री करून SAVE या बटनवर क्लीक करून माहिती अंतिम करावी.

Step 6 - Update Regularly


आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती उक्त निर्देशाप्रमाणे तात्काळ नोंदवावी आणि नियमितपणे अद्ययावत करावी.

Post a Comment

0 Comments

close