शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र सादर करून, राज्यातील शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार 13.02.2013 नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकांच्या टि.ई.टी प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे.
शिक्षक भरती जाहिरात pdf पवित्र पोर्टल - Click Here
जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा अभियानांतर्गत राबवायचे उपक्रम पहा - Click Here
शिक्षण सेवक भरती - पवित्र पोर्टल द्वारे भरणार 6000 शिक्षण सेवक
विविध परीक्षांच्या पेपरफुटीबरोबरच टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आला. त्यात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या प्रमुखांचा मोठा हात असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळेत १३ फेब्रुवारी २०१३ नंतर इयत्ता आठवी ते पाचवीपर्यंत टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती केलेल्या शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी करण्याबाबतचे निर्देश, राज्याचे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी मंगळवारी दिले आहेत.
त्याअनुषंगाने प्रत्येक शाळेतील 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची खालील तक्तामध्ये माहिती सादर करुन टिईटी उत्तीर्ण असल्याचे मुळ प्रमाणपत्र तपासणीकामी दि. 05/01/2022 पर्यंत उपलब्ध करुन दयावेत. सदर माहिती सादर करणेस विलंब करु नये, चुकीची माहिती सादर करु नये. वरिष्ठ कार्यालयास चुकीची माहिती सादर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची संबधीत मुख्याध्यापक तसेच संबधीत शिक्षकांची राहिल यांची नोंद घ्यावी.
2013 नंतर नियुक्त शिक्षकांची माहिती
अ.क्र
१) शिक्षकांचे नाव
२) शाळेचे नाव
३) संस्थेचे नाव
४) टि.ई.टी प्रमाणपत्र क्रमांक
५) उत्तीर्ण वर्षे
६) पेपर क्रमांक 1/2


0 Comments