राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नंबर १०९८ दर्शनी भागावर लिहून ठेवणेबाबत शासनाने सर्व शाळांना आदेशित केले आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलांच्या सुरक्षिततेसाठी व निकोप समतामुलक वातावरण निर्मिती साठी विविधस्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे यास अनुसरून पुढीलबाबी शाळांनी दर्शनी भागावर लिहून ठेवाव्यात.
सखी सावित्री समिती शासन निर्णय- Click Here१. निकोप आणि समतामुलक वातारण निर्मितीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नंबर १०९८ Child Helpline Number 1098
२. सखी सावित्री समितीमधील शाळेतील समिती सदस्यांची माहिती (नाव, भ्रमणध्वनी क्रमांक)
३. शाळांच्या हद्दीतील पोलिस स्टेशन अंतर्गत असलेले पोलीस काका/पोलीस दीदी यांचे (नाव भ्रमणध्वनी क्रमांक)
४. Drop Box (POSCO) विषयी माहिती
५. Chirag App बददल माहिती
६. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्याना येणा-या अडचणी यांचे निवारण करण्यासाठी तक्रार पेटी या विषयी सूचना फलक विद्यार्थ्यांना सहज दिसेल अशा दर्शनी भागावर लिहून ठेवणे.
तसेच सखी सावित्री समितीचे गठन प्रत्येक शाळेत करून मासिक बैठकांतून या सर्वाचा आढावा घेतला जावा.
शासन परिपत्रक
0 Comments