Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया बाबत चे Video / PDF मार्गदर्शन | New Video - अवघड क्षेत्र फेरी- संवर्ग 1 मधील शिक्षकांनी फॉर्म भरणे | शंका समाधान प्रश्नोत्तरे

जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया 21 एप्रिल च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीने होणार असून सदर बदल्याचे पोर्टल 9 जून पासून सुरु करण्यात येत आहे. या बदल्या 3 Phase मध्ये होणार आहेत. त्या सर्व टप्प्यांची माहितीचे मार्गदर्शन Video / PDF द्वारे येथे देण्यात येईल. 

जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा शिक्षक बदली संपूर्ण  Latest अपडेट व शासन निर्णय - Click Here

ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया 2022 मार्गदर्शक Video 


teacher transfer management system

Demo Video of vinsys transfer software


शिक्षक बदली 2022 होणार तीन phase मध्ये पहा सविस्तर - Click Here


ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया 2022-23 मार्गदर्शक Video 

32) अवघड क्षेत्र फेरी- संवर्ग 1 मधील शिक्षकांनी होकार/नकार कसा द्यावा | शंका समाधान


संवर्ग 4 बदली प्रक्रिया पूर्ण झाले नंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर व्हिन्सिस कडून स्पष्टीकरण पहा. Click Here


31) विस्थापित शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावेत? 

बदलीपात्र शिक्षकांची पहिली फेरी (Eligible Round 1) पूर्ण झाल्यानंतर ज्या बदलीपात्र शिक्षकांना पहिल्या फेरीत बदलीने नियुक्ती मिळाली नाही अशा शिक्षकांसाठी विस्थापित शिक्षकांची फेरी (Eligible Round 2) राबवली जाणार आहे. या विडियोमध्ये विस्थापित शिक्षकांच्या बदलीविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.


30) संवर्ग 4 (बदली पात्र) शिक्षकांना फॉर्म भरताना येणाऱ्या शंकाचे समाधान करणारा video Click Here हा video पाहण्या पूर्वी 29 क्रमांक चा video काळजीपूर्वक ऐका. 

प्रश्न व उत्तरे video



29) संवर्ग 4 ( बदली पात्र ) शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावेत? Video पहा Click Here

❓ एक युनिट चा लाभ कसा घ्यावा
❓एक युनिट चा लाभ घेताना फॉर्म कोणी भरावा
❓बदली झाल्यास / न झाल्यास काय होईल. 
❓बदली हवी हा पर्याय निवडला तर काय होईल
❓बदली नको हा पर्याय निवडला तर काय होईल
❓विस्थापित कोण कोण होऊ शकेल


28) बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावेत? Video पहा Click Here



27) संवर्ग 2 मधील शिक्षकांनी शाळांचा पसंतीक्रम कसा भरावा? Video पहा. Click Here



26) संवर्ग 1 मधील शिक्षकांनी शाळांचा पसंतीक्रम कसा भरावा? Video पहा. Click Here



25) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपीलावर निर्णय कसा घ्यावा?  Video पहा. Click Here



24) शिक्षण अधीकाऱ्यांनी अपीलावर निर्णय कसा घ्यावा? 

Video पहा. Click Here



23) शिक्षकांनी अपील कसे करावे? सविस्तर माहिती पहा. 

बदलीपात्र, बदली अधिकारप्राप्त, विशेष संवर्ग भाग १ व भाग २ या याद्यांवर आक्षेप घेण्याची सुविधा प्रणालीमध्ये देण्यात आलेली आहे. या याद्यांमधील दुरुस्तीसाठी शिक्षक प्रथम शिक्षण अधिकाऱ्यांकडे अपील करू शकतात.  परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय शिक्षकास मान्य नसेल तर शिक्षक पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अपील करू शकतात. शिक्षकांनी अपील कसे करावे याबाबत सविस्तर माहिती येथे देण्यात आलेली आहे.

Video पाहण्यासाठी येथे टच करा. Click Here



22) बदलीपात्र व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या पुन्हा प्रकाशित केल्या जाणार. कशाप्रकारे प्रकाशित केल्या जातील पहा. 

या आधी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी जाहीर केलेली आहे परंतु शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ चे अर्ज भरल्यानंतर त्यामध्ये बदल होऊ शकतात म्हणून गट शिक्षण अधिकारी बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी पुन्हा एकदा प्रणालीवर कश्या प्रसिद्ध करतील व विशेष संवर्ग भाग १ व भाग २ यादी देखील कशी प्रसिद्ध करतील? याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.


21) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ अर्ज कसे रद्द करावे?

विशेष संवर्ग भाग १ अथवा भाग २ या संवर्गांमधून शिक्षकांनी अर्ज भरला असेल आणि पडताळणीमध्ये त्या अर्जामधील माहिती चुकीची आढळली तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असा अर्ज कसा रद्द करता येईल याची सविस्तर माहिती या विडियो मधून दिलेली आहे.

Video पाहण्यासाठी येथे टच करा. Click Here



20) संवर्ग १ व संवर्ग 2 मधील शिक्षकांनी बदली फॉर्म कसा भरावा याबाबतचा Video पहा.

Video पाहण्यासाठी येथे टच करा. Click Here



19) बदली पोर्टल वर रिक्त पदांची यादी अपलोड करणेबाबत... 



18) 24 September 2022 update - ऑनलाईन जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया लवकरच सुरु होणार - मा. आयुषप्रसाद CEO / बदली प्रक्रिया समिती प्रमुख- Video पाहण्यासाठी येथे टच करा. - Click Here


17) अवघड क्षेत्र, बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे Click Here

या विडियो मध्ये आपण टप्पा क्रमांक ३ जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील सर्वात प्रथम असणारी महत्त्वाची प्रक्रिया अवघड क्षेत्र, बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे ह्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेच शिक्षकांची जिल्हांतर्गत प्रक्रिया ही या याद्यांवर अवलंबून असणार आहे, त्यासाठी ह्या याद्या कोण, कशा व केव्हा प्रसिद्ध करतील याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहेत.

See Here 👇



16) जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती | जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया कशी होईल? - Click Here

या विडियो मधून आपण जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. 
अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरायची सेवा, शिक्षक, सक्षम अधिकारी, बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक, विशेष संवर्ग भाग १ व भाग २, बदली पात्र शिक्षक इ. बाबत शासन निर्णयानुसार बदल्यांचे सुधारित धोरण काय आहे ते पाहणार आहोत. तसेच ही जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीमध्ये कशी राबवली जाईल याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
Loading..... 
 See here👇


15) शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज कसा भरावा? (भाग 2) - Click Here

👇



14) शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज कसा भरावा? (भाग १) - Click Here

👇



13) Roster म्हणजेच बिंदुनामावली बाबत सविस्तर माहितीचा Video  - Click Here

या विडिओ मधून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये असणाऱ्या बिंदूनामावली या महत्त्वाच्या मुद्याबाबत येथे सविस्तर माहिती मिळणार आहे. संगणकीय बदली प्रणालीमध्ये बिंदूनामावली कोण व कसे भरू शकते ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे शिक्षण अधिकाऱ्यांनी Roster म्हणजेच बिंदूनामावलीचा फॉर्म कसा भरायचा याची मुद्देसूद महिती घेणार आहोत.👇



12) NOC नाहरकत प्रमाणपत्र व आंतर जिल्हा बदली साठीच्या 4 संवर्गा ची सर्व माहिती - Click Here

या विडियो मधून तुम्हाला आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील संवर्ग 1 -  NOC ना हरकत प्रमाणपत्र याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. तसेच शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करताना NOC, संवर्ग 1, संवर्ग 2, सर्वसाधारण यापैकी पर्याय  कसा निवडावा याबद्दल मार्गदर्शन देखील केलेले आहे. त्यामुळे शिक्षकांना अर्ज करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. 👇



10) आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2022 (Phase 2) सर्व माहिती - Click Here

या विडियोमध्ये तुम्हाला आंतरजिल्हा बदली प्रक्रिया Phase 2 बाबत तपशीलवार माहिती मिळेल.  तसेच आंतरजिल्हा बदली मध्ये कोणते शिक्षक भाग घेऊ शकतात?, आंतरजिल्हा बदलीसाठी GR मध्ये नमूद केलेले महत्वाचे मुद्दे, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया कशी राबवली जाईल? याबद्दललची सविस्तर माहिती मिळेल. 👇



9) तुमचे प्रश्न आमची उत्तरे भाग 1

या विडियो मध्ये शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करताना येणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे. • ज्या शिक्षकांची २०१९ च्या आधी ऑफलाइन बदली झाली आहे. • ज्या शिक्षकांची बदली विस्थापित पद्धतीने झाली असेल. • ज्या शिक्षकांची पदोन्नती किंवा पदावनती होऊन बदली झाली असेल. • जर न्यायालयीन आदेशाने दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षकाची बदली झाली असेल. • प्रशासकीय अथवा समयोजनाने जिल्हांतर्गत बदली झाली असेल. अशा सर्व शिक्षकांनी प्रोफाइल माहिती भरताना Last Transfer Category (शेवटचा बदली प्रवर्ग) व Last Transfer Type (शेवटचा बदली प्रकार) कोणता निवडावा याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच ZP Joining Date (जिल्हापरिषदेत नियुक्ती झाल्याची तारीख) व District Joining Date (सध्याच्या जिल्हात रुजू झाल्याची तारीख) म्हणजे काय व बदली अधिकार कधी प्राप्त होतो? याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
Demo Video 👇


8) बदली पात्र व बदली अधिकार पात्र म्हणजे काय? Click Here

या विडियोमध्ये तुम्हाला बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षक म्हणजे नेमके काय याची तपशीलवार माहिती, तसेच विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 याचा लाभ कोणते शिक्षक घेऊ शकतात आणि या संवर्गांचे वैशिष्ठ याबद्दललची विस्तृत माहिती मिळेल.
Demo Video 👇


7) शिक्षणाधिकारी यांची Phase 1 मधील भूमिका? - Click Here

या विडियोमध्ये तुम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांना फेज १ मध्ये कोणते महत्वाचे व जबाबदारीचे काम करायचे आहे याची तपशीलवार माहिती मिळणार आहे.
ज्या शिक्षकांना गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेले बदल मान्य नाहीत ते शिक्षक शिक्षण अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवू शकतात. Phase 1 मध्ये शिक्षण अधिकाऱ्यांना फक्त या नोंदवलेल्या आक्षेपांवरच कार्यवाही करायची आहे.
Demo Video 👇


6) सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा? - Click Here

या विडियोमध्ये तुम्हाला शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा व आक्षेप घेताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलची तपशीलवार माहिती आणि प्रशिक्षण मिळेल.
Demo Video 👇


5) गटशिक्षणाधिकारी यांची phase 1 मधील भूमिका - Click Here

या विडियोमध्ये तुम्हाला गटशिक्षण अधिकाऱ्यांना फेज १ मध्ये कोणते महत्वाचे व जबाबदारीचे काम करायचे आहे याची तपशीलवार माहिती मिळणार आहे. शिक्षकांनी माहिती अद्ययावित केल्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांना सर्व शिक्षकांच्या माहितीची तपासणी व पडताळणी करायची आहे. त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांनी निर्धारित वेळेत माहिती अद्ययावित केलेली नाही किंवा कधीही प्रोफाइल पाहिलेले नाही त्या सर्व शिक्षकांचे प्रोफाइल गटशिक्षण अधिकारी स्वत:च Force Acceptance (सक्तीची स्वीकृती) द्वारे स्वीकृत करतील त्यानंतर त्या शिक्षकांना त्यांच्या माहितीमध्ये कोणतेही बदल करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
Demo Video 👇


4) शिक्षक प्रोफाईल अपडेट कशी करावी? - How teachers should fill in the information - Click Here

Demo Video 👇


3) Difficult and General areas information - Click Here

Demo Video 👇



2) How to login Video - Teacher Transfer Portal Login - Click Here

Demo Video 👇


1) Role and Responsibility Video - Online Teacher Transfer portal phase 1 Role and Responsibility Video - Click Here

Demo Video 👇






Post a Comment

0 Comments

close