Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वच्छता पखवाडा २०२२ उपक्रम आयोजन करणेबाबत.

०१/०९/२०२२ ते १५/०९/२०२२ या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक / कर्मचारी तसेच पालक यांनी स्वच्छता पखवाडा हा कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या पाणी व स्वच्छता विभाग या विभागाकडून कळविण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या स्वच्छता पखवाडा कृती आराखड्यानुसार स्वच्छता पखवाडा हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करावयाची आहे.

स्वच्छता पखवाडा मध्ये तीन प्रमुख गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे - १) हात धुणे, २) मास्क लावणे आणि ३) सुरक्षित अंतर. या तीन गोष्टींचा उपयोग करुन शाळा / कॉलेज मध्ये दिलेल्या कालावधीमध्ये स्वच्छता पखवाडा साजरा करणे आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ चे नियमांचे काटेकोरपणे पालन करुन स्वच्छता पखवाडा साजरा करावा.

दि. ०१/०९/२०२२ ते १५/०९/२०२२ या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येकाच्या घरी स्वच्छता पखवाडा साजरा होण्याच्या दृष्टीने कृती आराखड्यानुसार आखणी करुन त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करण्यात आले आहे. 

स्वच्छता पखवाडा २०२२ उपक्रमाबाबतचे शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here




Post a Comment

0 Comments

close