Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 साठी विद्यार्थी आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करणेबाबत

शैक्षणिक वर्ष सन २०22-23 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१2 वी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखामार्फत SARAL Database वरुन भरावयाची आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येते.


व्यवसाय अभ्यासकम घेणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र(Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय येवून परीक्षेस प्रविष्ठ हो इच्छिणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे त्याचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे.


उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१2 वी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करणेबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

1) नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे - SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा

नियमित शुल्कासह - शनिवार दि. १/१0/२०२2 ते शुक्रवार दि. 21/१0/२०२2
विलंब शुल्कासह -   -

आवेदनपत्र सादर करण्यासाठी वेबसाइट


2) नियमित सोडून इतर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे - SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा (माध्यमिक शाळांनी पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी)

नियमित शुल्कासह - शनिवार दि. 22/१0/२०२2 ते शनिवार दि. 05/१1/२०२2
विलंब शुल्कासह - -

आवेदनपत्र सादर करण्यासाठी वेबसाइट 


3) उच्च माध्यमिक शाळांनी चलन DOWNLOAD करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGSद्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती/ चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व शाळा प्रमुख / प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.
Post a Comment

0 Comments

close