Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

UPSC Exam Training Application | युपीएससी मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC EXAM) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येईल. 






मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र (नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर), यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिका संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी यांच्यामार्फत 'केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्वपरीक्षा २०२३'चे पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन केले आहे.

अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा ४ डिसेंबर २०२२ रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत राहील. 

परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना 'www.siac.org.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


UPSC Exam Training Application / Registration link - Click Here

युपीएससी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी लिंक - Click Here

Post a Comment

0 Comments

close