Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली वर्षभराच्या कामकाजाची दिशादर्शिका | शिक्षण आयुक्तालय दिशादर्शिका 2023 PDF डाउनलोड करा.

एक लाख नऊ हजारांपेक्षा अधिक शाळांचा आणि हजारो कर्मचाऱ्यांचा कारभार पाहणाऱ्या,  महिनोन् महिने कामांची रेलचेल असणाऱ्या शिक्षण खात्याचा व्याप प्रचंड मोठा आहे. त्यामुळेच येथे  कामे अडून राहण्याचे प्रकार घडतात. परंतु आता शिक्षण खात्यात काम घेऊन येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला वाट पाहत बसण्याची गरज नाही. कारण, येत्या वर्षभरात कोणत्या दिवशी कोणते काम, कोणत्या वेळी आणि कुणामार्फत होणार आहे, याचे तारीखवार नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून १२ महिन्यांच्या कामकाजाची "दिशादर्शिका' तयार करण्यात आली आहे.


स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्र PDF - Click Here

एखाद्या कॅलेंडरसारखी शिक्षण विभागाची ही दिशादर्शिका आहे. त्यात शिक्षण आयुक्तांपासून तर ३६ जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत कोणी कोणते काम कोणत्या दिवशी करावे, याचे नियोजन देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षभर शिक्षण विभागातील कोणत्याही स्तरावरील अधिकाऱ्याला आपल्या जबाबदारीपासून हात झटकणे अशक्य होणार आहे.

बुधवार आणि गुरुवार अधिकारी पाहणार शाळा

प्रत्येक बुधवार आणि गुरुवार हा क्षेत्र भेटीसाठी निश्चित करण्यात आला आहे. या दोन दिवसांत प्रत्येक जिल्ह्यातील दुर्गम तसेच उपक्रमशील शाळांना अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. शिक्षण खात्याने आता शिक्षणगाथा हे त्रैमासिक सुरू केले आहे. पहिल्या अंकातच वर्धा, अहमदनगर, हिंगोली, सातारा आदी जिल्ह्यांतील शिक्षकांना आपल्या विविध उपक्रमांची गाथा लिहिण्याची संधी देण्यात आली आहे.

शिक्षण आयुक्तालय दिशादर्शिकेचे स्वरुप

या दिशादर्शिकेत अगदी सुरुवातीला शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बारा प्रकारच्या योजनांची माहिती दिली आहे. तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. 

दिशादर्शिकेत प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची कामे वेगवेगळ्या रंगांत नमूद करण्यात आली आहेत. आयुक्तांची लाल, प्राथमिक शिक्षण संचालकांची निळ्या, माध्यमिक शिक्षण संचालकांची काळ्या, योजना शिक्षण संचालकांची जांभळ्या रंगात देण्यात आली आहेत. राज्यातील आठही विभागीय शिक्षण उपसंचालकांची कामे तांबड्या रंगात, ३६ जिल्ह्यांमधील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची कामे हिरव्या रंगात आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याची कामे गुलाबी रंगात व योजना शिक्षणाधिकाऱ्यांची कामे करड्या रंगात नमूद केली आहेत.

शिक्षण आयुक्तालय दिशादर्शिका PDF डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close