Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निपुण भारत :- अध्ययन अभ्यास सर्वेक्षण प्रश्नावली pdf | इ.2री ते इ. 5वी शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना

इ.2 री ते इ.5वी साठी निपुण भारत :- अध्ययन अभ्यास सर्वेक्षणाच्या आयोजनासाठी यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्र


निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षणासाठी प्रथम भाषा, गणित, परिसर अभ्यास १ व २ , तृतीय भाषा या विषयांसाठी  १० माध्यमांमध्ये चाचण्यांचे विकसन करण्यात आलेले आहे. सदर चाचण्या व शिक्षक सूचनापत्रे shorturl.at/eBPQY इथे उपलब्ध आहेत.



निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना PDF डाउनलोड करा. - Click Here

👉 उद्बोधन सत्र लिंक - Click Here

वरील विषयान्वये इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांचे निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण कसे करावे, सर्वेक्षण साधन (Tool) रचना, मूल्यांकन, रुब्रिक रचना, श्रेणींची नोंद, विद्यार्थी कृती-कार्यक्रम यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शिक्षकांसाठी दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता ते ०१:०० या कालावधीत यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. 

निपुण भारत :- अध्ययन अभ्यास सर्वेक्षण | इ.2री ते इ. 5वी साठी यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्र 👇 Live


या सत्रासाठी  इयत्ता दुसरी ते पाचवीला अध्यापन करणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी  खालील  यु-ट्युब लिंकवर  ऑनलाईन उपस्थित राहण्यास सूचित करावे.

काही शिक्षकांना काही कारणास्तव या सत्रास उपस्थित राहणे शक्य न झाल्यास खालील यू ट्यूब लिंकवर ते आपल्या सोयीनुसार सत्र पाहू शकतात.

तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक), शिक्षण  विस्ताराधिकारी (सर्व), केंद्रप्रमुख (सर्व),  BRC विषय साधन व्यक्ती व विशेष साधन व्यक्ती यांनी सुद्धा उपस्थित रहावे.

निपुण भारत :- अध्ययन अभ्यास सर्वेक्षण उद्बोधन सत्र | इ.2री ते इ. 5वी साठी यु-ट्युब लिंक - Click Here


( राजेश पाटील ) भा.प्र.से

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Post a Comment

0 Comments

close