Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

केंद्रसमूहाची सुधारित संरचना करणेबाबत. | केंद्रशाळेमध्ये नवीन शाळा समाविष्ट करणेबाबत शासन परिपत्रक

शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक १४.०९.१९९४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदातील प्राथमिक शाळांमध्ये सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी एकूण ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदरची केंद्रीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या १० प्राथमिक शाळाकरिता १ याप्रमाणात निश्चित करण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत नविन शाळा मंजूर झालेल्या आहेत. त्यामुळे सदर मंजूर केलेली केंद्रसमूहाची संरचना सुधारित करणे आवश्यक असलेबाबत निर्देश दिलेले आहेत.


सद्यस्थितीत मंजूर असलेल्या पदांमध्ये समान शाळा वाटप व भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन केंद्रसमूहाची सुधारित संरचना करण्यात यावी. त्यानुसार सुधारित संरचनांचा केंद्रनिहाय प्रारूप आराखडा तयार करुन दिनांक १०.०२.२०२३ पर्यंत केंद्रसमूहाची सुधारित संरचनेचा प्रत्येक केंद्रास जोडण्यात आलेल्या शाळांच्या नावासह प्रस्ताव संचालनालयास सादर करावा. असे आदेशात म्हटले आहे. 

केंद्रसमूहाची सुधारित संरचना करणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close