Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NEET 2023 होणार 07 मे 2023 रोजी.... परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या सूचना...

NEET 2023 परीक्षा 07 मे 2023 रोजी होणार आहे. NEET 2023 परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना पहा. NEET परीक्षेला जाण्यापूर्वी काय करावे? सोबत कोणत्या गोष्टी असाव्यात? ड्रेस कोड कसा असावा? या संदर्भात सर्वसाधारण सूचना माहिती करून घ्या.

परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना पहा. 

  • नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) असणं गरजेचं आहे. neet.nta.nic.in या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
  • ॲडमिट कार्डची कलर प्रिंटआऊट असावी. त्यावर पासपोर्ट साईज फोटो असावा.
  • ॲडमिट कार्डवर तुमची सही असेल याची खात्री करुन घ्या.
  • विद्यार्थ्यांना सकाळी 11.30 वाजल्यापासून परीक्षागृहात प्रवेश मिळण्यास सुरुवात होईल.
  • परीक्षागृहात प्रवेश करण्याची अखेरची वेळ दुपारी 1.30 वाजता असेल.
  • यानंतर परीक्षेसंदर्भातील घोषणा होतील आणि विद्यार्थ्यांना टेस्ट बुकलेट दिल्या जातील.
  • दुपारी 2 पासून परीक्षेला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5 वाजता परीक्षा संपेल.

NEET EXAM ला जाण्यापूर्वी च्या कृती


1. ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढा (शक्यतो कलर व A4 साईज पेपर वरती)
2. विद्यार्थ्याचा Passport size photo Admit card च्या Page 1 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे.
3. विद्यार्थ्याचा Postcard size फोटो Admit card च्या Page 2 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे. व त्यावर डाव्या साईडला क्रॉस Signature करावे.
४. पालकांची सही दिलेल्या जागी घेणे
५. विद्यार्थ्यांची सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा हा एक्झाम हॉल मध्ये गेल्यानंतर करायची आहे त्यामुळे सुरुवातीस  करू नये.

NEET परीक्षेला ला जाताना सोबत आवश्यक असणाऱ्या गोष्टी


१. एडमिट कार्ड (All Pages)
२. पासपोर्ट साईज फोटो (जास्त काॅपिज सोबत ठेवाव्यात)
३. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल
४. ओरिजनल आयडेंटी कार्ड (आधार कार्ड /बारावी बोर्ड एडमिट कार्ड)
५. मास्क व ग्लोव्हज
६. स्वतःचा हॅन्ड सॅनिटायझर (५० मिली)
७. साधा ट्रान्सपरंट ब्लॅक बॉल पेन

NEET परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना


१.विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड मध्ये दिलेल्या रिपोर्टिंग टाइमिंग च्या अगोदर पोहोचावे.
२. प्रत्येकासाठी रिपोर्टिंग टाइमिंग वेग वेगळे आहे.त्याप्रमाणे नियोजन करावे.
थोडासा उशीर झाला म्हनून घाबरून जाऊ नये ,विनंती करावी, 1.30 नंतर कोणालाही आत घेतले जाणार नाही हे मात्र पक्के लक्षात असू द्या.
३. वरील दिलेल्या सर्व गोष्टी सोबत घेऊन जाव्यात.
४. ऍडमिट कार्ड वरील दिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात.
५. परीक्षेच्या अगोदर सेंटर बद्दल माहिती घ्यावी.
६. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो अगोदरच्या दिवशी सेंटर वरती पोहचावे.

अधिक माहितीसाठी Admit card वरील सूचना व्यवस्थित वाचाव्यात.


NEET Exam साठीचा ड्रेस कोड

१. ड्रेस हाफ स्लिव्हज् असावा.
२. मुलींनी पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट घालावे.
३. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू , घड्याळ यांना घालण्यास बंदी आहे.
४. ड्रेस वरती एम्ब्रोईडरी किंवा डिझाईन नसावे. मोठे बटन सुद्धा नसावेत.
५. ड्रेस साधा असावा. भरपूर पाॅकेट्स नसावेत.
६. कोणत्याही प्रकारची ज्वेलरी वापरू नयेत
७. शूज वापरू नयेत. चप्पल साध्या असावेत. चपला चा सोल हा जाड नसावा.
८. बेल्ट वापरू नये

*Light coloured, half sleeve shirt or T shirt*
*For pants, No multiple pockets, belts, chains and no big buttons.*
*Girls can wear pant shirt or half sleev salwar or leggings and kurta,  without dupatta* 
*Can wear Chappal, sleeper, open floaters with thin sole. No shoes.* 
*No any ornaments like earrings, chains, bangles, nose pin, ring. Wrist watches, wallets not allowed.*
*All electronic gadgets are not allowed*


परीक्षा झाल्यावर


1. आपले पासपोर्ट साईज फोटो अटेंडन्स शीट वरती चिकटवावेत. 

2. आपले एडमिट कार्ड परीक्षा संपल्यावर सुपरवायझर कडे जमा करायचे आहे.

पालकांना सूचना:

आपल्या पाल्याची परीक्षा संपेपर्यंत सेन्टर पासून खुप दूर कोठेही जावू नये.
दरम्यानच्या कालावधीत कोठे थांबणार आहात हे आपल्या पाल्यांना अगोदरच सांगून ठेवावे, म्हणजे मध्येच गरज भासली तर संपर्क करणे सोयीचे होईल.


Post a Comment

0 Comments

close