Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Chandrayaan-3 mission soft landing Live Telecast ISRO website / official you tube link

Chandrayaan-3 mission soft landing Live Telecast ISRO website / official you tube link भारताचे चंद्रयान- ३ चंद्रावर उतरणे हा एक अमूल्य प्रसंग आहे. आपल्यासाठी उत्सुकता अभिमान वाढणारा प्रसंग तर आहेच पण शालेय विद्यार्थ्यामध्ये शोधाची आवड निर्माण होण्यासाठी देखिल उपयुक्त प्रसंग आहे. 


आज दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटापासून पुढील १८ मिनिटे भारताचे चांद्रयान ३ हे यान अत्यंत कठीण टप्पे  पार करत चंद्रभूमीवर उतरणार आहे. याची देही याची डोळा तुम्हाला हे  लाईव्ह पाहायला मिळणार आहे.

चांद्रयान २ च्या अयशस्वी प्रक्षेपणानंतर संपूर्ण देशाला अभिमान वाटावी अशी घटना आज घडणार आहे. आपली हजारो अडचणीची कामे बाजूला ठेवून, आजचे हे सुवर्णक्षण आपण अनुभवावे. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री/इतर वाहिनी सहित सर्व वाहिनीवर हे दृश्य आपणास पाहायला मिळेल.

आपण तर पहावेच पण आपल्या विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना सुद्धा या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध करून द्या.

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक यांचे एकत्रित विशेष संमेल्लन आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Chandrayaan-3 mission soft landing Date - 23rd August 2023

Chandrayaan-3 mission soft landing Time - from 5:45 pm


Chandrayaan-3 mission soft landing Live Telecast on ISRO website

https://www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html

Chandrayaan-3 mission soft landing Live Telecast on ISRO Official You Tube

https://www.youtube.com/live/DLA_64yz8Ss?feature=share

See Chandrayaan Landing movement on moon at 43 to 46 mins in above video. 



🇮🇳 Chandrayaan-3 Mission soft landing

👍 बेस्ट लक... इस्रो...🙂❤️

👇 आज संध्याकाळी 5:45 पासून असा असेल 18 मिनिटांचा थरार

आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत जे होणार आहे ते समजून घेऊ.

1. *रफ ब्रेकिंग फेज* 😗 

25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड  Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका  कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन  800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून  7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .


 2.

*Atitude Holding फेज*


"Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.

यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.


3.

 *Fine ब्रेकिंग फेज* 


175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल.  योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल. 


 4.

*टर्मिनल डीसेंट फेज* 


हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल 🙂.. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. 🙂🙂 


5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे. 


ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. 🙂🙏🏽


🇮🇳 चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. 

https://www.shaleyshikshan.in/2023/08/chandrayaan-3-mission-soft-landing-live.html


➡️ *Share with your friends*




चांद्रयान 3 लॅंडिंग इस्रो वेबसाइट live telecast

https://www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html


ISRO YOU TUBE Link - https://www.youtube.com/live/DLA_64yz8Ss?feature=share


ISRO Official Facebook page


ISRO official website - https://www.isro.gov.in

Post a Comment

0 Comments

close