Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन 2023 | सन 2023 मध्ये दि. 21 ऑगस्ट ते दि 29 ऑगस्ट 2023 या कालावधीत क्रीडा शपथ व विविध खेळांचे आयोजन

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दि. २९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. सन २०२३ मध्ये दि. २१ ऑगस्ट ते दि २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कोणताही १ दिवस सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करावयाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.


राष्ट्रीय क्रीडा दिन 2023 यावर्षीची संकल्पना 

खेळ हा सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी एक सहाय्यक ठरावा. (Sports as an enabler for an inclusive and fit society) अशी असून त्यानुसार राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करावयाचे आहे. 

राज्यातील सर्व शाळांनी दि. २१ ऑगस्ट ते दि २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कोणताही १ दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करावयाचा आहे.


त्यासाठी पुढील मुद्द्याप्रमाणे कार्यवाही करावी. 

१. उपरोक्त नमूद कालावधीपैकी कोणताही १ दिवस व्यायामाचे खेळ, समकालीन खेळ किंवा स्वदेशी खेळ याबाबतचे उपक्रम आयोजित करावेत.

२. वैयक्तिक उपक्रम न घेता समूहातील उपक्रम आयोजित करावेत, जेणे करून विद्यार्थ्यांमध्ये एकता सर्वसमावेशकता ही मूल्ये वाढीस लागतील.

३. विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून क्रीडास्पर्धा किंवा तत्सम उपक्रम आयोजित करावेत. 

४. लिंगसमभाव अनुसरून विद्यार्थ्यांना २, ४ किंवा ६ गटांमध्ये विभाजित करावे.

५. गटांची नावे ही स्वातंत्र्यवीर किंवा प्रसिद्ध खेळाडू यांच्या नावाने द्यावीत.

६. विद्यार्थ्यांना स्थानिक उत्तम खेळाडूंचा परिचय करून द्यावा, 

7. शिक्षक व विद्यार्थी यानी शक्यतो खेळासाठी योग्य असा पोशाख करावा.

८. जिंकणाऱ्या गटाला मेजर ध्यानचंद यांच्या नावाची ट्रॉफी देण्यात यावी.

९. शाळांनी त्यांच्याकडे उपलब्ध व्यवस्थे नुसार खाली दिलेल्या खेळांपैकी कोणत्याही खेळांची निवड करावी.

१. आउटडोअर गेम्स - चालणे शर्यत, व्हॉलीबॉल, हॉकी, मिनी फुटबॉल, टेनिस बॉल

२. इनडोअर गेम्स - खोलीतील किंवा सभागृहातील खेळ-बॅडमिंटन, बुद्धिबल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, रस्सीखेच

३. फनी गेम्स - चमचा लिंबू शर्यत / पोते शर्यत, दोरीवर चढणे शर्यत, लगोरी/ लंगडी, फळी आव्हान. 


10. सदर क्रीडा दिनाच्या दिवशी सोबत जोडलेल्या भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या परिपत्रकातील फिट इंडिया ची शपथ सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी म्हणावी.

फिट इंडिया शपथ PDF | Fit India Pledge PDF - Click Here


११. क्रीडा दिन आयोजित करण्याबाबतच्या आणि साजरा केल्यानंतरच्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये किंवा पोस्ट स्वरूपात जास्तीत जास्त सामाजमाध्यमांवर शेअर कराव्यात. 

१२. शाळांनी फिट इंडिया पोर्टलवर (https://fitindia.gov.in) किंवा फिट इंडियामोबाईल ॲपवर आपल्या शाळेतील उपक्रमांची माहिती, फोटो व व्हिडीओ अपलोड करावेत.

१३. सोबत जोडलेल्या भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली, यांच्या परिपत्रकातील दिलेल्या लिंकवरून प्रसिद्धीची संकल्पना घेता येईल.


याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत प्राचार्यांनी सूचित करावे.


तसेच प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल परिषदेतील कला क्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या इमेल आय डी वर सादर करावा.

राष्ट्रीय क्रीडा दिन 2023 शासन परिपत्रक

29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन 2023 | सन 2023 मध्ये दि. २१ ऑगस्ट ते दि २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कोणताही १ दिवस सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करणे बाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close