जिल्हांतर्गत बदली 2024 - शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.
शासन निर्णय दि. २१.०६.२०२३ अनुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वी पासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, अशी तरतूद आहे. (21 जून 2023 चा शासन निर्णय डाउनलोड करा.) नवीन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छूक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे, अशी मागणी उक्त निवेदनान्वये करण्यात आलेली आहे. याअनुषंगाने नमूद करण्यात येते की, शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२३ मधील अ.क्र.२ अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत या विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्राम विकास विभागाच्या सहमतीने दिनांक २१.०६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयामधील नमूद अ.क्र. २ अनुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत, ही विनंती.
जिल्हांतर्गत बदली 2023-24 बाबत शासन परिपत्रक 17 मे 2024
जिल्हांतर्गत बदली 2023-24 बाबत शासन परिपत्रक 11 मार्च 2024
आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती
आंतरजिल्हा बदली टप्पा 6 मधील शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत शासन परिपत्रक व बदली याद्या - Click Here
जिल्हांतर्गत बदली सन 2023-24
🛑🛑महत्वाचा सूचना🛑🛑
आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी झालेल्या VC मधील सूचनेनुसार जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन 2023-24 ( विनंती बदली) अंतर्गत खालील बाबींचा कटाक्षाने विचार करावा.
जिल्हांतर्गत बदली 2023-24 बाबत शासन परिपत्रक 06 मार्च 2024
१. विशेष संवर्ग भाग १ - अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती Cadre -1 असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
2. विशेष संवर्ग भाग २ -अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणारा शिक्षकांची माहिती Cadre -2 असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे.
3. बदली अधिकार प्राप्त - अवघड क्षेत्र अंतर्गत पात्र व विनंती बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती Entitled असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे.
4. बदली पात्र बदली पात्र-शिक्षकांमधून विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती Eligible असा शिरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे.
5. इतर वरील चारही संवर्गामध्ये न येणाऱ्या परंतु विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती Other असा शेरा नमूद करून भरण्याची आहे.
जिल्हांतर्गत बदली 2024 - विनंती बदली अर्ज PDF डाउनलोड करा. Click Here
रत्नागिरी - जिल्हांतर्गत विनंती बदल्या होणार 13 मार्च रोजी
परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
🛑 सदरची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडील प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनानुसार पार पाडली जाणार असल्याने त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या सद्यस्थितीतील अद्ययावत रिक्त पदांनुसार समुपदेशनाद्वारे विकल्प स्वीकारले जातील. सद्यस्थितीत विकल्प देण्याची आवश्यकता नाही.
🛑 सोईची जागा नसेल तर नकार देता येईल... विनंती बदली मागितली आहे म्हणून आधीच रिक्त पद दाखवले जाणार नाही अगर त्याचा समावेश आधीच केला जाणार नाही ...जो शिक्षक विनंतीने अन्य शाळा मागेल त्याला ती शाळा दिल्यानंतर त्याची मुळ शाळा रिक्त पदात समाविष्ट करण्यात येईल. समुपदेशन वेळी रिक्त असणारी शाळाच दाखवली जाईल व ती मागता येईल.
🛑 सदर बदली फक्त समुपदेशनावेळी उपलब्ध असलेल्या रिक्त असलेल्या पदांवर होईल... कोणालाही खो देऊन /आपसी बदली करण्यात येणार नाही.
🛑 पुरविणेत आलेल्या GOLDEN FILE मध्येच फक्त विनंती बदली अर्जदार शिक्षकांची माहिती वरील सूचनांप्रमाणे सादर करणेची आहे.
🛑 उद्या दुपारी 12 पर्यंत शिक्षकांकडून अर्ज प्राप्त करून घेऊन सदरची माहिती उद्या सायं 4 पर्यंत खास दुतामार्फत या कार्यालयास सादर करणेची आहे
🛑 तसेच विषय शिक्षक पदोन्नती माहिती देखील उद्या दुपारी 1 पर्यंत शिक्षकांनी केंद्रस्तर तर ४ वाजेपर्यंत ग. शि. यांनी एकवटी व कागदपत्रांसह या कार्यालयास सादर करणेची दक्षता घ्यावी
🛑 कोणत्याही संघटना लोगो असणारे अर्ज स्वीकारला जाणार नाही... संघटनांनी सुद्धा अनधिकृतपणे प्रशासनाच्या परवानगी शिवाय कोणतेही प्रपत्रे परस्पर पाठवून गोंधळ निर्माण करु नये... सर्व गशिअ व केंद्रप्रमुख यांनी असे फॉर्म स्विकारू नयेत....असे फॉर्म सादर करणारे शिक्षक अपात्र ठरविण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
🛑 केंद्रस्तर/ तालुकास्तरावर विनंती बदली व पदवीधर पदोन्नती माहिती संकलन, छाननी इ.साठी सक्षम मनुष्यबळ व तंत्र स्नेही व्यक्ती इ.दोन्ही यंत्रणा वेगळी असावी. जेणेकरून काम करताना विलंब अथवा गोंधळ होणार नाही असे नियोजन करावे.
शिक्षणाधिकारी (प्राथ)
जिल्हा परिषद सांगली
0 Comments