शाळा पूर्वतयारी मेळावा पूर्वतयारी कशी करावी? कोणकोणते स्टॉल लावावेत? स्टॉलची मांडणी व आवश्यक साहित्य, सेल्फी पॉईंट
शाळापूर्व तयारी अभियान सेल्फी पॉईंट नमुने पहा.
शाळेत दाखल करावयाचा नमुना फॉर्म | शाळा प्रवेश फॉर्म डाउनलोड करा.
शाळापूर्व तयारी अभियान मेळावा आयोजनासाठी संपूर्ण PDF डाउनलोड करा.
शाळा पूर्वतयारी मेळावा स्टॉलची मांडणी व आवश्यक साहित्य
🎯 स्टॉल क्र 01 नाव नोंदणीपत्रक, नोंदणी कक्ष
साहित्य :- कार्डशिट पेपर , स्केचपेन , आरती ताट , फुले , चॉकलेट , वजनकाटा , मीटर उंची पट्टी , टेबल क्लाथ , फुलदाणी सजावटीसाठी इ.
शाळापूर्व तयारी मेळावा स्टॉल बॅनर PDF डाउनलोड करा.
🎯स्टॉल क्र 02 शारिरीक विकास
▪️अंतर्भुत घटक-
1.दोरी उड्या मारणे
2. चेंडु फेकणे
3. होडी तयार करणे.
4. चित्रात रंग भरणे.
साहित्य :- कार्डशिट पेपर , बादली , लहान चेंडू , दोरीउडी दोरी , कोरे कागद , पेन्सिल , रिंग , रंगपेटी , टेबल क्लाथ , इ,
🎯स्टॉल क्र. 03 बौद्धिक विकास
▪️अंतर्भुत घटक-
1. लहान मोठा ठरवणे.
2. वर्गीकरण करणे.
3.जोडी लावणे.
4. चित्र वस्तू क्रमाणे लावणे.
साहित्य :- फळे , पक्षी , फुले , भाज्या , धान्य , वेगवेगळ्या प्रकारचे झाडाची लहान मोठी पाने , पाटी , पेन्सिल , गणित पेटी मधील साहित्य , इंग्रजी पेटीमधील साहित्य पेन , वही , खोडरबर , लेखन , कंगवा आरसा , कुलूप , चावी , सुई दोरा , खडू डस्टर , कप बशी , कार्डशिट पेपर , टेबल क्लाथ , फुले , चॉकलेट .इ,
🎯स्टॉल क्र 04 सामाजिक आणि भावनात्मक विकास
▪️अंतर्भुत घटक-
1. परिवारातील सदस्यांची नावे सांगणे
2. खेळामध्ये सहभाग घेणे
3.स्वच्छ नीटनेटके राहणे
4.धिटपणाने बोलणे
साहित्य :- कार्डशिट पेपर , स्केचपेन , एक लहान व एक मोठा चेंडू , टेबल क्लाथ , डिंक , चिकट टेप , फोटोत दाखवल्या प्रमाणे तीन मुद्द्यांचे प्रश्ननावली तयार करण्यात येणार असल्यामुळे कार्डशिट 3 ते 4 इ.
🎯स्टॉल क्र 05 भाषा विकास
▪️अंतर्भुत घटक-
1. चित्र वर्णन
2.गोष्ट सांगणे
3.अक्षर ओळख
4.अक्षर लेखन
साहित्य :- चित्रकार्ड , अक्षरकार्ड , मुळाक्षरेकार्ड , कोरे कागद , पाटी लेखन , डस्टर , टेबल क्लाथ , कार्डशिट पेपर , स्केचपेन इ.
🎯स्टॉल क्र 06 गणनपूर्व तयारी
▪️अंतर्भुत घटक-
1. कमी जास्त ओळखणे
2.आकार ओळखणे
3.अंक ओळखणे
4. वस्तू मोजणे
साहित्य :-- मणी , गोट्या, बारीक दगड , पाने , फुले , शंख , पेन , पेन्सिल , चॉकलेट , 1 ते 9 अंककार्ड , भौमितीक आकार , टेबल क्लाथ , कार्डशिट पेपर , स्केचपेन , गोंद , चिकट टेप इ.
🎯स्टॉल क्र 07 प्रमाणपत्र वितरण व मार्गदर्शन
फुलांचे हार ,गुच्छ , कार्डशिट पेपर , स्केचपेन , ( प्लास्टिक किंवा ओरिजनल फुलहार ) टेबल क्लॉथ , फुलदाणी इ.
0 Comments