Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ईद-ए-मिलाद सुट्टी 2024 | Eid-E-Milad Holiday 2024 | 16 सप्टेंबर की 18 सप्टेंबर? | सर्व जिल्हा अपडेट

ईद-ए-मिलाद सुट्टी 2024 | Eid-E-Milad Holiday | मुबंई शहर व मुंबई उपनगर मध्ये 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबर रोजी जाहीर | इतर जिल्ह्यात सुट्टी कधी घ्यावी हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात येणार आहे. 


क्रमांक सार्वसु-११२४/प्र.क्र.१०६/२०२४/जपुक (२९). - शासनाने सन २०२४ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्टया परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ करिता अधिसूचना, क्र.सार्वसु. ११२३/प्र. क्र.१४८/कार्या-२९, दि.०९ नोव्हेंबर, २०२३ अन्वये अधिसूचित केल्या आहेत.


२. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. सबब, मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात येत आहे.


३. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा.

मुंबई शहर - 18 सप्टेंबर रोजी सुट्टी

मुंबई उपनगर - 18 सप्टेंबर रोजी सुट्टी

जळगाव - 18 सप्टेंबर रोजी सुट्टी


धुळे - 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

सोलापूर - 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

सिंधुदुर्ग - 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

लातूर - 16 सप्टेंबर रोजी सुट्टी


ईद ए मिलाद सुट्टी बाबत शासनाची अधिसूचना डाउनलोड करा. Click Here


Eid-E-Milad Public Holiday


No. PHD-1124/C.R.106/Japuk (29). -The Government of Maharashtra has separately declared 24 Public Holidays for the year 2024 notified the section 25 of the Negotiable Instruments Act, 1881(XXVI of 1881) as per Notification No. PHD.1123/C.R.148/Japuk (Desk-29), dated 09th November, 2023.

2. Among the 24 public holidays notified by the State Government, the Eid-e-Milad holiday is indicated on Monday, September 16, 2024. Eid-e-Milad, a religious festival of Muslims, is widely celebrated by the Muslim community on a large scale. A procession program is organized on this occasion. On Tuesday, September 17th, 2024 since there is the Hindu festival of Anant Chaturdashi, to maintain peace and social harmony between the two communities The Muslim Community has taken decision to organize procession program on Wednesday, 18th September, 2024. Therefore, the public holiday of Eid-e-Milad is being declared on Wednesday, September 18, 2024 instead of Monday, September 16, 2024.

3. Other than the district of Mumbai City and Mumbai Suburbs, the District Collector in other districts of the State take decision considering, the date of the procession programe taken by the Muslims in their districts, whether the Public Holiday declared on Monday, September 16,2024 should be maintained or cancelled the same and to declare on Wednesday, September 18, 2024.

Post a Comment

0 Comments

close