Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा परिषदेच्या या शाळांच्या नावापूर्वी लागणार PM SHRI | असे होईल नवीन नाव PM SHRI Z P SCHOOL......

PM SHRI योजनेतून मंजूर झालेल्या शाळेच्या नावासमोर यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये  "PM SHRI" prefix लावण्यात येणार. असे होईल नवीन नाव PM SHRI Z P SCHOOL.......


सन २०२३-२४ या वर्षापासून केंद्र शासनाकडून PM SHRI योजना कार्यान्वित केली आहे. सदर योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रथम टप्प्यात ५१६ व दुसऱ्या टप्प्यामध्ये ३११ अशा प्रकारे एकूण ८२७ शाळांची निवड करण्यात आली आहे. PM SHRI योजना राज्य व केंद्र शासन यांच्या मदतीने राबविण्याकरिता MoU झालेला आहे. 

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या दि. ३०/०८/२०२४ रोजीच्या पत्रानुसार PM SHRI योजने अंतर्गत मंजूर झालेल्या शाळेच्या नावासमोर PM SHRI हे नाव जोडण्यात यावे व त्याप्रमाणे यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेचे नाव बदल करून घेण्याकरिता कळविण्यात आले आहे.

PM SHRI योजनेशी जोडलेल्या शाळेचे नाव यु-डायस प्लस प्रणालीमध्ये, प्रमाणपत्र व मार्कसिटवर ठळक अक्षरावर दिसण्याबाबत कळविले आहे. त्याप्रमाणे संबंधित शाळांनी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेचे नाव अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही करुन Udise  portal वर शाळेच्या नावापूर्वी PM SHRI हे prefix जोडण्याची कार्यवाही करण्यात यावी. 

Udise + Portal Link - Click Here

सोबत सुलभ माहितीसाठी PM SHRI योजने अंतर्गत मंजूर झालेल्या शाळांची यादी व भारत सरकारकडील पत्र.

PM SHRI योजनेतून मंजूर झालेल्या शाळेच्या नावासमोर यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये  "PM SHRI" prefix लावणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close