राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शाळा व संबंधित शैक्षणिक संस्थेत तज्ञ समुपदेशक तयार करण्यासाठी अनेक वर्षापासून मार्गदर्शन व समुपदेशन हा पदविका प्रमाणपत्र हा एक वर्षीय प्रमाणपत्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. Diploma in Guidance and Counselling (DCGC-2025) मार्गदर्शन व समुपदेशन पदविका प्रमाणपत्र
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शाळा व संबंधित शैक्षणिक संस्थेत तज्ञ समुपदेशक तयार करण्यासाठी अनेक वर्षापासून मार्गदर्शन व समुपदेशन हा पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जात आहे. सदर अभ्यासक्रम NCERT मार्फत शालेय संस्थेमध्ये तज्ञ समुपदेशक उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व शालेय परीसंस्थेशी संबंधित व्यक्तीसाठी आहे.
मार्गदर्शन व समुपदेशन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा दूरस्थ व प्रत्यक्ष पद्धतीने राबविला जातो. यात तीन टप्प्यांचा समावेश आहे. मार्गदर्शित स्वयंअध्ययन - ( ६ महिने दूरस्थ अध्ययन), अभ्यासकेंद्रावर संपर्क कार्यक्रम (३ महिने) आणि अंतरवासिता (३ महिने, अध्ययनार्थीच्या स्वजिल्ह्यात किंवा कार्यक्षेत्रामध्ये),
मार्गदर्शन व समुपदेशन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतो.
यासाठी संदर्भीय पत्रानुसार राज्यातील किमान २० व्यक्तींनी नोंदणी करणे अपेक्षित आहे. संबंधित पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी संबंधित बाब शिक्षण क्षेत्रातील या संबंधात कार्य करू इच्छिणाऱ्या इच्छुक व्यक्तींच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.
यासाठीची घोषणा NCERT च्या www.ncert.nic.in या साईटवर लवकरच करण्यात येणार आहे असे संदर्भान्वये नमूद करण्यात आले आहे. या साठीची निवड चाचणी व मुलाखत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. यासाठी संभाव्य अध्ययनार्थीची यादी NCERT ला प्राप्त झाल्यास त्यासंबंधात कार्यवाही करण्यासाठी NCERT ला पुढील कार्यवाही करणे सुकर होऊ शकते.
या प्रमाणपत्र पदविकेसाठी शासकीय, शासनमान्य विभागातील व्यक्तींनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१. अध्ययनार्थी सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर या क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक असला पाहिजे.
२. अध्ययनार्थी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीच्या आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अभ्यासकेंद्र येथे प्रवास करणे यासारख्या शारीरिक आरोग्य तसेच अनुषंगिक सर्व अटीची पूर्तता करण्यास सक्षम असला पाहिजे.
३. अध्यापनाचे माध्यम हिंदी व इंग्रजी असल्याने अध्ययनार्थीला इंग्रजी भाषेचे आवश्यक ज्ञान असणे आवश्यक आहे.
४. अध्ययनार्थीची १० वर्षे सेवा बाकी असणे आवश्यक आहे.
५. अध्ययनार्थीने हा अभ्यासक्रम यापूर्वी केला असू नये.
६. केवळ अभ्यासक्रमाचे शुल्क रुपये ६०००/असून इतर अनुषंगिक बाबी उदा. प्रवास खर्च, अभ्यासकेंद्र येथे राहणे व तत्संबंधित सर्व अध्ययनार्थीने करण्याची तयारी असली पाहिजे.
७. सदर अध्ययनार्थीला ३ महिने अभ्यासकेंद्र येथे अध्ययन करणे अपेक्षित असल्याने संबंधित संस्थेची परवानगी आवश्यक आहे.
सदर सुचनेसह जिल्ह्यातील इच्छुक व्यक्तींना सदर अभ्यासक्रमाची नोंदणी करण्यासाठी नमूद नोंदणी लिंकवर सादर अर्ज ऑनलाईन पद्धतीने ५ नोव्हेंबर पर्यंत भरणे आवश्यक असल्याने त्यासंबंधित माहिती जिल्ह्यातील शिक्षकांपर्यंत पोहोचवणे तसेच सदर अध्ययनार्थीची नोंदणी RIE, भोपाळ येथे होणार असल्याने अभ्यास केंद्राची निवड योग्यपणे करण्यास आपल्या स्तरावरून सूचित करावे. याबाबत संचालक यांनी पत्रक काढले आहे.
0 Comments