जिल्ह्यात सुशासन सप्ताहानिमित्त प्रशासन गाव की ओर या उपक्रमांतर्गत १९ ते २४ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सुशासन सप्ताह उपक्रमांतर्गत शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी २३ व २४ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी व बारावीपर्यंतच्या मुलींची आरोग्य तपासणी सर्व शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुलींच्या व्यक्तिगत समस्यांवर मार्गदर्शन तसेच सर्वसामान्य आरोग्य विषयक सवयी, मासिक पाळी व्यवस्थापन, आहाराबाबत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच दुपारच्या सत्रात मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे.
२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांना गावातील ग्रामपंचायत कार्यालय, बैंक, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना आदी क्षेत्रभेटी घडविण्यात येणार आहे. तसेच मी सरपंच झालो तर, माझे सुंदर, स्वच्छ गाव या विषयावर निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.
0 Comments