आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत विविध शासन निर्णय व परिपत्रके पहा.
परिपत्रक - आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत CEO पुणे जिल्हा परिषद यांचे परिपत्रक 03/12/2024
शासन निर्णय 03/10/2023 या शासन आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदली झाल्याने सेवाजेष्ठता शुन्य होते म्हणून कर्मचाऱ्यांच्या पुर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतुद आहे. सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यत सुरु आहे. या निर्णयानंतर दुसऱ्या कोणताही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. असे ग्रामविकास विभागाने माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे.
त्याअनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या आपल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने पात्र कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ मंजुर करणेबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी परिपत्रक काढले आहे.
आगाऊ वेतनवाढ बाबत CEO पुणे जिल्हा परिषद यांचे परिपत्रक 03/12/2024 - Click Here
शासन निर्णय - आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत शासन निर्णय
१. ग्रामविकास विभाग मंत्रालचय मुंबई यांचेकडील शारान आदेश क्रमांक लोआप्र २००२/प्र. कं. ६३/ आरथा ५ मंत्रालय मुंबई दिनांक 03/10/2023
२. ग्रामविकास विभाग मंत्रालचय मुंबई यांचेकडील माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्र. माअअ-२०२३/५. कं. ३५३ आस्था ४/ दिनांक 05/09/2023
0 Comments