Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

२२ मार्च - जागतिक जल दिन | 22th March - World Water Day

'जागतिक जल दिन' हा एक आंतरराष्टीय दिवस आहे. प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.




संयुक्त राष्ट्रसंघ (UNO) च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे.


जागतिक जल दिन थीम

प्रत्येक वर्षी एक विषय अथवा थिम घेतली जाते. 2025 च्या जागतिक जल दिनाची थीमहिमनदी संवर्धन” आहे, जगातील हिमनद्यांचे संरक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्यासाठी या थिमची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण पृथ्वीचे जलचक्र राखण्यात हिमनद्यांची भूमिका महत्त्वाची असते.


यावर्षी जागतिक जल दिवस साजरा करताना हाच संदेश दिला जात आहे की ,

१. जागतिक तामानवाढीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

२. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे.

३. पाण्याचे सर्व स्त्रोत्र, नद्या, तलाव वगैरे प्रदूषणमुक्त करून पाण्याची उपलब्धता वाढवणे गरजेचे आहे.

४.भूजल भरणी करून भूजलाची पातळी वाढवायला हवी.

५. शेती व उद्योग क्षेत्रात पाण्याचा कमी वापर करून उत्पादन वाढवता येईल अशा तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.

६. जनतेने पाण्याची नासाडी कमी करून आपल्या पाण्याची उपलब्धता वाढवणे महत्त्वाचे ठरेल.


निसर्गाचा समतोल विकास करून हवामान पूर्ववत करणे व त्यासाठी लागणारे सर्व उपाय जगभरातील सर्व लोकांनी, सरकारांनी अमलांत आणणे अत्यंत गरजेचे आहे . तसेच पाण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनदेखील बदलायला हवा. पर्यावरण, सामाजिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या पूर्वापार चालत आलेला संदेश या वर्षीच्या जल दिनातून दिला जात आहे. उत्तर भारतातील सर्व नद्या या हिमालयातून उगम पावतात. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढते आणि हिमनद्या ( Glaciers) विरघळून त्यांना उन्हाळ्यात भरपूर पाणी मिळते, त्यामुळे त्या भागातील लोकांना पिण्यासाठी तसेच उन्हाळी शेतीसाठीह पाणी उपलब्ध होते. भारतातील इतर नद्या मात्र उन्हाळ्यात आटत जातात. त्यामुळे हिमनद्यांचे संरक्षण हे अत्यंत महत्वाचे तसेच गरजेचे आहे.


पाण्याशी संबंधित प्रश्‍न कोणते ?

पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?

पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?

भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?

नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?

तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?

पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?

पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?

पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?

पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?

पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?


आपली भूमिका काय ?

स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे. 

पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे. 


लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’. प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो, उद्याची तहान भागवण्यासाठी.

Post a Comment

0 Comments

close