Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

National Teacher Award 2025 announced | राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर. महाराष्ट्रातील 3 शिक्षकांचा समावेश.

केंद्रीय शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची (National Teacher Award) घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील संदीपान जगदाळे, शेख मोहम्मद वकीउद्दीन, सोनिया विकास कपूर या तीन शिक्षकांना 2025 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी निवड झालेल्या शिक्षकांचा पुरस्कार सोहळा 5 सप्टेंबर 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे.




सन 2024 मधील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांविषयी माहिती जाणून घ्या - Click Here


प्रत्येक पुरस्कारामध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, रोख पुरस्कार आहे.  50,000/- आणि एक रौप्य पदक.  हॉटेल 'द अशोक', 50-बी, डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह, चाणक्यपुरी, नवी दिल्ली 110021 (फोन: 011-26110101) येथे 3 सप्टेंबर (दुपारी) ते 6 सप्टेंबर 2025 (दुपारी) पर्यंत राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  3 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता हॉटेल अशोक, नवी दिल्ली येथे एक संक्षिप्त बैठक आयोजित केली जाईल.


देशातील 45 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील शेख मोहम्मद वकीउद्दीन आणि लातूरचे संदीपान जगदाळे यांचा गौरव होणार आहे. मुंबईतील सोनिया विकास कपूर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.


राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विषयी माहिती वाचा










राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार  2025 साठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांची माहिती

National Teacher Award 2025 announced

केंद्र सरकारने सोमवारी (२५ ऑगस्ट) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली. देशभरात ४५ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला.


महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले, असून यात मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन व लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाचे डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे यांचा समावेश आहे. यासह मुंबईतील अनुशक्तीनगर केंद्रीय विद्यालयातील सोनिया विकास कपूर यांचाही यात समावेश आहे.

1) डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे

लातूर येथील डॉ. संदीपान जगदाळे हे दयानंद कला महाविद्यालयात संगीताचे शिक्षक आहेत. लातूर जिल्ह्यातून हा मान मिळविणारे ते पहिलेच शिक्षक ठरले आहेत. डॉ. जगदाळे यांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे आणि शैक्षणिक बांधिलकीमुळे संगीत विषयाला नवे आयाम दिले आहेत. त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध शैक्षणिक प्राधिकरणांवर कार्य केले आहे. 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळविणे हे शिक्षकाचे स्वप्न असते. संगीत, समाजसेवा व शैक्षणिक क्षेत्रातील निष्ठेचे हे फळ आहे. २६ वर्षापासून संगित शिक्षक म्हणून काम करत असताना, विद्यार्थ्यांसाठी सांगेतिक, सामाजिक, सांस्कृतिक असे विविध उपक्रम राबविण्यावर माझा भर राहिला आहे. माझे अनेक विद्यार्थी अभिनयासह विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य, राष्ट्रप्रेम आणि लोकसहभागाची प्रेरणा देण्याबाबत नेहमी प्रयत्नशील असतो.

- डॉ. संदीपान जगदाळे


2) डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन

अर्धापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन यांनी अल्पसंख्याक मुलींचे शिक्षणातील गळतीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी 'सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी' या उपक्रमाची दखल राज्यपातळीवरही घेण्यात आली होती. यासह डिजिटल शाळा, अद्ययावत ग्रंथालयासह विविध उपक्रमांमुळे शाळेची पटसंख्या हजाराच्या घरात पोहचली. 


आम्हा शिक्षकांसाठीचा हा सर्वोच्च पुरस्कार असतो. पुरस्कार माझा नसून विद्यार्थी, माझ्या गावकऱ्यांचा आहे. आमच्या शाळेची स्थापना ११५ वर्षापूर्वीची आहे. मोठी परंपरा असलेल्या शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रेरित केले नसते तर हा पुरस्कार मिळणे शक्य नसते. डिजिटल शाळा, ग्रंथालय अशा उपक्रमांमुळे आमची शाळा पीएमश्री शाळेच्या यादीत निवडली गेली. पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेची पटसंख्या नऊशेपेक्षा अधिक आहे. यासह आमच्याकडे अल्पसंख्याक मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आम्ही 'सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी' उपक्रम राबविला होता. त्याचा परिणाम गळतीचे प्रमाण कमी झाले. 

डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन


3) सोनिया विकास कपूर

मुंबई येथील ऍटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूल क्रमांक दोन मधील शिक्षिका सोनिया विकास कपूर यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

Post a Comment

0 Comments

close