वीर गाथा 6.0 प्रकल्प राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविणेबाबत शासन परिपत्रक
संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये वीर गाथा ६.० हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
वीर गाथा 6.0 उपक्रमाचा उद्देश
शौर्य पुरस्कार विजेते व प्राचीन भारतीय योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसेच नागरी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
Gallantry Awards Portal (GAP) अंतर्गत वीर गाथा प्रकल्पाची स्थापना सन २०२१ मध्ये करण्यात आली. देशातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित प्रकल्प/उपक्रम राबविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून (कला, कविता, निबंध, मल्टिमिडिया) प्रकल्प सादर करता येतात. सर्वोत्तम प्रकल्पांना संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येते. हा उपक्रम दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याबरोबर साजरा करण्यात येतो.
वीर गाथा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत स्वतंत्र "वीर गाथा कॉर्नर" स्थापन करण्यात यावा. या कॉर्नरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व प्रतिभेला वाव देण्यात यावा. या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे योग्य दस्तऐवजीकरण करण्यात यावे. तसेच उपक्रमांची उच्च दर्जाची (HD) छायाचित्रे आणि संबंधित माहिती/आकडेवारी जतन करून ठेवावी जेणेकरून भारत सरकारकडे (Gol) आवश्यकतेनुसार सादर करणे सोयीचे होईल.
राज्यातील सर्व व्यवस्थानाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांची MYGOV या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता / परिच्छेद/ चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing)/Multi-Media Presentation/Short Video (Anchoring/Storytelling/Reporting of War) असे विविध प्रकल्प करू शकतात. सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.
शालेय स्तरावर इयत्तानिहाय पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धांचे आयोजन केले जावे.
वीर गाथा प्रकल्प ६.० स्पर्धाच्या काही महत्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे-
१. शाळांनी वीर गाथा प्रकल्प ६.० मधील कविता / परिच्छेद / चित्रकला (Painting) / रेखाटन (Drawing)/Multi-Media Presentation / Short Video (Anchoring/Storytelling/Reporting of War) इ. सर्व प्रवेशिका नोंदणी MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावी.
२. शाळा स्तरावरून MYGOV या पोर्टलवर अपलोड झालेल्या नोंदणी जिल्हा स्तरावर रुब्रीक्स मूल्यांकन Annexure। अवलोकन करून, मूल्यांकन करावे.
वीर गाथा प्रकल्प ६.० साठी मूल्यमापनासाठी तीन स्तर असतील. त्यामध्ये जिल्हा स्तर, राज्य/केंद्र शासित प्रदेश स्तर आणि राष्ट्रीय स्तर प्रत्येक स्तरावर विजेते असतील.
वीर गाथा 6.0 प्रकल्प घोषित करण्यात येणाऱ्या विजेत्याची संख्या पुढील प्रमाणे असेलः
जिल्हास्तर - ०४ विजेते (प्रत्येक श्रेणीतील एक) यांची निवड जिल्हा स्तरावर करण्यात यावी. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राज्य स्तरावर करण्यात यावे. (श्रेणी १ व २ मधून प्रत्येकी १ विजेता आणि श्रेणी ३ मधून २ विजेते यात इयत्ता ९ वी ते १० वी मधून १ विजेता व इयत्ता ११ वी १२ वी मधून १ विजेता)
राज्यस्तर - ०८ (प्रत्येक श्रेणीतील दोन) यांची निवड राज्य स्तरावर करण्यात येईल. निवड झालेल्या विजेत्याचे नामनिर्देशन राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल. (श्रेणी १ व २ मधून प्रत्येकी २ विजेते आणि श्रेणी ३ मधून ४ विजेते यात इयत्ता ९ वी ते १० वी मधून २ विजेते व इयत्ता ११ वी १२ वी मधून २ विजेते)
राष्ट्रीय स्तरावरील १०० विजेते (सुपर १००) असतील. त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणेः
श्रेणी १ : इयत्ता ३ री ते ५ वी २५ विजेते
श्रेणी २: इयत्ता ६ वी ते ८ वी २५ विजेते
श्रेणी ३: इयत्ता ९ वी ते १२ वी ५० विजेते (इ.९ वी ते १० वी मधून २५ विजेते व इ.११वी ते १२ वी मधून २५ विजेते)
३. विजेत्यांचा सत्कार राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा संयुक्तपणे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सत्कार केले जाणार आहेत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी पर्यत वीर गाथा ६.० प्रकल्प मधील स्पर्धा घेऊन संरक्षण मंत्रालयाच्या MYGOV या पोर्टलवर वीर गाथा ६.० स्पर्धेची माहिती पत्रात दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे भरण्यात यावी. तदनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करावे. पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना देखील अवगत करावे. या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
सोबत - 1. VEER GATHA 6.0 CONCEPT NOTE.
Websites for References: The Following links can be referred by Schools:
i. Website- www.gallantryawards.gov.in to know in detail about the brave-hearts.
ii. NCERT book on Paramvir Chakra Awardees at the link:
https://ncert.nic.in/pdf/publication/otherpublications/veergatha.pdf
Veer Gatha Project link
https://innovateindia.mygov.in/veer-gatha-project/





0 Comments