दिक्षा कोर्स - Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10 | सायबर सुरक्षिततेच्या सवयी : वैयक्तिक डिजिटल उपकरणे - B10
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या NISHTHA कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७मधील Cycle 2 अंतर्गत "Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10" हा ऑनलाइन कोर्स DIKSHA प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा कोर्स मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी अधिकारी यांच्यासाठी उपलब्ध आहे.
सदर कोर्सचा प्रारंभ दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ असून, कोर्समध्ये नोंदणी करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२७ आहे. तसेच, कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२७ आहे.
तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील / अधिनस्त सर्व संबंधिताना सदर कोर्समध्ये विहित मुदतीत नोंदणी करून तो पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
कोर्सचा तपशील :
Course Name: Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10
Medium: English
Starting Date: ०१ ऑक्टोबर २०२६
Enrolment Closing Date: १० मार्च २०२७
Course Closing Date: १५ मार्च २०२७
कोर्स अभ्यासक्रमाचे विवरण
सध्याच्या काळात, डिजिटल उपकरणांच्या सुलभतेमुळे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत, आपण एक जागरूक आणि सुजाण 'नेटिझन' (इंटरनेट वापरकर्ता) असणे आवश्यक आहे. 'सायबर हायजीन पद्धती' (सायबर सुरक्षिततेच्या सवयी) या विषयावरील या ऑनलाइन अभ्यासक्रमाचा उद्देश वापरकर्त्यांना काही मूलभूत गोष्टींबाबत आवश्यक ज्ञान आणि माहिती देणे व त्यांना सक्षम करणे हा आहे.
अभ्यासक्रमाचा आढावा
विभाग ०१: डेस्कटॉप किंवा लॅपटॉप सुरक्षा
विभाग ०२: मोबाइल सुरक्षा
Course Overview
Module 01: Desktop or Laptop Security
Module 02: Mobile Security
Course Link:
How to Enroll Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices | सायबर सुरक्षिततेच्या सवयी : वैयक्तिक डिजिटल उपकरणे प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?
Step by Step Guidance
Step 1 - Play Store वरुन Diksha Course app डाउनलोड करा.
दिक्षा कोर्स ॲप डाऊनलोड लिंक
Diksha Course App Download Link - Click Here
किंवा दिक्षा ॲप वरुन उजव्या कोपऱ्यातील खालील बाजूस Courses येथे टच करुन सदर ॲप डाऊनलोड करता येईल.
Step 2 - Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10 | सायबर सुरक्षिततेच्या सवयी : वैयक्तिक डिजिटल उपकरणे या कोर्सच्या लिंक ला टच करा.
Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10 | सायबर सुरक्षिततेच्या सवयी : वैयक्तिक डिजिटल उपकरणे कोर्स लिंक :
https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1664§ion=3321
किंवा Diksha Course app वरुन Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10 असे सर्च करुन कोर्स शोधू शकता.
Step 3 - Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10 हा कोर्स Enroll करा.
Step 4 - दिलेल्या घटकानुसार video व चाचणी पूर्ण करा.
Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices हा कोर्स पूर्ण करण्यासाठी खालील लिंकला टच वरुन Diksha Course app डाउनलोड करा.
Diksha Course App - Click Here
0 Comments