म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंदीरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाकडून (इग्नू) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने ३० जूनपर्यत अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना पाच विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम करता येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. मात्र, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येते, असे विद्यापीठाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना हा पीजी डिप्लोमा प्रोग्रॅम एचआरम, एफएम, ओएम, एमएम, एफएमपी अशा पाच अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमाचा कमीत कमी कालावधी हा एक वर्ष तर अधिकचा कालावधी हा तीन वर्षांचा राहणार आहे. एका वर्षाला दोन सेमिस्टर अशा प्रकारचे हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. www.ignou.ac.in या वेबसाइटवरून विद्यार्थी माहिती घेऊ शकतात. तसेच, प्रवेशअर्ज डाउनलोड करून तो कागदपत्रांच्या प्रतींसह आणि शुल्काच्या डीडीसह विद्यापीठाच्या प्रादेशिक कार्यालयातून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करायची शेवटची मुदत ही ३० जून आहे. दरम्यान, एमबीएला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा असून, त्याची माहिती वेबसाइटवर उपलब्ध असणाऱ्या माहिती पुस्तिकेत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहिती इग्नू, प्रादेशिक कार्यालय, एमएसएफसी इमारत, सेनापती बापट रस्ता, पुणे या पत्त्यावर मिळेल. अधिक माहितीसाठी ०२० -२५६७१८६४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
...........
अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्रता
- कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक
- खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के गुण आणि राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के गुण
- सीए, कॉस्ट अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरीशिप असणारे प्रवेशासाठी पात्र
- वयाची कोणतीही अट नाही.
.........
पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम
- ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (एचआरएम)
- फायनॅन्शियल मॅनेंजनेंट (एफएम)
- ऑपरेशन्स मॅनेजमेंट (ओएम)
- मार्केटिंग मॅनेजमेंट (एमएम)
- फायनॅन्शियल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस (एफएमपी)
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments