Option Form भरताना ………………………
१. तुमच्या आवडत्या Branch ला प्रथम प्राधान्य द्या
२. एकाच नावाची खूप कॉलेज आहेत तेंव्हा Option Form भरताना काळजीपूर्वक Option टाका नावावरून प्रवेश घेऊ नका.
३. तुमचा एक चुकीचा निर्णय तुमच्या भावितव्यावर खूप परिणाम करू शकतो.
४. मुंबईमधील कॉलेजचा Cut -Off जास्त असतो. Cut -Off जास्त म्हणजे कॉलेज चांगले हे साफ चुकीचे आहे.
५. पुण्यामधील सर्वच कॉलेज चांगली हा समज चुकीचा आहे. पुणे विद्यापीठातील ८ ते १० कॉलेज सोडली तर बाकी कॉलेजमध्ये प्लेसमेंटची शाश्वाती नाही.
६. अभियांत्रिकीला प्रवेश मिळवणे सगळ्यात सोपं आहे जरी तुम्हाला MHT-CET मध्ये २० ते २५ marks असतील तरी चांगलं कॉलेज मिळू शकत ते हि कोणतेही अधिकचे पैसे ना घालवता त्यामुळे मनजमेंट कोट्यातून प्रवेश घेणं टाळा.
७. इंजिनीरिंगसाठी शक्यतो शैक्षणिक कर्ज टाळावे. त्यापेक्षा TFWS कोठ्यातून प्रवेश घ्यावा (OPEN Category साठी).
८. TFWS मधून प्रवेश घेताना चांगल्या खाजगी कॉलेजला प्राधान्य द्या. खाजगी कॉलेजमध्ये Tution जास्त असते ते सगळी माफ होते पण शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये Tution कमी असते ते त्यामुळे त्याचा जास्त फायदा होत नाही जसे कि GOVT ENGG COLLEGE PUNE (COEP) ची TFWS फीस 75350 आणि PICT ची TFWS फीस 11672.
९. महाराष्ट्रातील फक्त ४० ते ५० कॉलेजमध्ये चांगले प्लेसमेंट आहे तेही २५ ते 35000 हजार प्रतिमहिना तेव्हा उगाच जास्त फीस असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं टाळाव. चांगले प्लेसमेंट असलेल्या महाराष्ट्रातील इंजिनीरिंग कॉलेजची लिस्ट campusengineer.com या वेब साईट उपलब्ध आहे
१०. खाजगी इंजिनीरिंग कॉलेजमध्ये करिअर Guidance सेमिनारला भेट देणे टाळावे .एखाद् कॉलेज प्रवेशासाठी वारंवार फोन करत असाल तर त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं टाळावं.
११. केंद्र सरकारच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याला प्राधान्य द्या जसे कि IIT, NIT, IIIT आणि या याशिवाय बरीच कॉलेज आहेत जिथं जवळपास १००% P.hD प्राध्यपक असतात आणि शिक्षण माफक खर्चात उपलब्ध असून चांगल्या पगाराची नौकरी मिळायची शक्यता असते.
१२. इंजिनिरिंग शिक्षणासाठी NBA Accreditation मह्त्वाचे असून तुमची Branch ला Accreditation आहे का याची खात्री करूनच ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रातील केवळ ४० ते ४२ कॉलेजला NBA Accreditation आहे.
१३. जर चांगल्या खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नसेल तर शासकीय अभियांत्रिकी कॉलेजला प्राधान्य द्या.
१४.कॉलेजमध्ये मागील वर्षी ७०% पेक्षा जास्त प्रवेश झाले असतील तरच तिथे प्रवेश घ्या.
१५.जवळपास ९०% खाजगी कॉलेजमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आणि प्लेसमेंट चा अभाव आहे.
१६.वर्तमानपत्रातील जाहिरातीवर लक्ष देऊ नये. ९०% फसव्या जाहिराती असतात.
१७. शक्यतो Autonomous कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याला प्राधान्य द्या.
१८. प्रवेश घेताना जुन्या कॉलेजला प्राधान्य द्या.
१९. प्राध्यापकांच्या पगारी वेळेवर होतात का याची खात्री करूनच प्रवेश घ्या.
२०.भारतातील चांगल्या कॉलेजची लिस्ट campusengineer.com या वेब साईटवर उपलब्ध आहे. तसेच मागील ३ वर्षाचे प्लेसमेंट रेकॉर्ड उपलब्ध आहे. तेव्हा प्रवेश घेण्यापूर्वी आपल्या कॉलेजचे नाव त्या लिस्ट मध्ये कूठे आहे आणि प्लेसमेंट चेक करू शकता.
या लिंक वर पहा
Top Engineering Colleges in India
http://campusengineer.com/bestengineeringcollegesinindia/
Top Engineering Colleges in Maharashtra (Above 50% Placement)
https://campusengineer.com/only-35-engineering-colleges-in-maharashtra-have-50-or-more-placement-check-the-list/
NBA Accredited Colleges in Maharashtra
https://campusengineer.com/nba-accredited-maharashtra-engineering-colleges-top-engineering-colleges/
List of Autonomous Engineering Colleges in Maharashtra
https://goo.gl/6sJTmt
NAAC Grades of Maharashtra Engineering Colleges
https://goo.gl/AZC1CS
Name of Maharashtra Engineering Colleges in MHRD-NIRF 2018 Ranking
https://goo.gl/mNE7Ep
Campus Engineer Educational Consultant
#Trust of 40000 +plus Students and Parents
Mob Number: 9960852249
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2122576461150421&id=1808757215865682


0 Comments