*शारदे हवे तुझे वरदान ll धृ ll*
मानवतेची गावी गाणी,
अशी आम्हा दे जिवंत वाणी l
अन्यायाचे दर्शन होता,उसळो त्वेष उधान ll१ll
*शारदे हवे*.......
स्वतंत्र भारतभूचे वैभव ,सामर्थ्याने नटलेले नव,
उच्छवासाचा प्रबंध व्हावा, गाता भारत गान ll२ll
*शारदे हवे*.......
मराठीयेची नगरी आम्ही शिल्पकार की रचनाप्रेमी
जीवन मंदीर उभवू सुंदर हा अमुचा
अभिमान ll३ll
*शारदे*..........
उकलायाला जीवनशास्त्रे,पहावया नव विक्रमक्षेत्रे
दिव्यदृष्टी दे करावयाला उन्नत जीवन मान ll४ll
*शारदे हवे*........
दिवंगतांच्या अतृप्त आशा,पूर्ण कराया अशी मनीषा,
भीष्मकामना निववाया दे,अर्जुन शर संधान ll५ll
*शारदे हवे*.......
नव्या युगाची नवीन सृष्टी नव्या मानवा दे नव दृष्टी
हवा शारदे नवा वीरंची नवचातुर्य निधानll६ll
*शारदे हवे*........


0 Comments