Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वार्षिक वेतनवाढ नियमावली शासन निर्णय

वार्षिक वेतनवाढ नियमावली शासन निर्णय GR

1 - वार्षिक वेतनवाढ नियमावली शासन निर्णय 26.12.2011

म. ना. से. (सुधारित वेतन) नियम, २००९ च्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असताना वार्षिक वेतनवाढीचा पुढील दिनांक विनियमित करणेबाबत  चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक ला टच करा.

  वेतनवाढ खालीलप्रमाणे विनियमित करण्यात यावी

अ)शासकीय कर्मचारी मागील वर्षाच्या १ जुलैपासून चालू वर्षाच्या ३० जूनपर्यंत सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास, त्याला चालू वर्षाच्या १ जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय होईल. 

ब) शासकीय कर्मचारी मागील वर्षाच्या १ जुलैपासून चालू वर्षाच्या ३० जूनपर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास, त्याला चालू वर्षाच्या १ जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ देय न होता, ती पुढील वर्षाच्या दिनांक १ जुलै रोजी अनुज्ञेय होईल. 

 
क) वरील अटी दि.१/७/२००६ रोजी व तद्नंतर वेतनवाढ देय होणाऱ्या प्रकरणी लागू राहतील. 

३. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (१) अपवाद (१) - (ए) (एक) नुसार परिविक्षाधीन म्हणून एखादया पदावर थेट नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची पहिली वेतनवाढ, त्याचा एक वर्षाचा परिविक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यावर देण्यात यावी अशी तरतूद आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांना १ जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ देण्याची तरतूद असल्याने, अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियुक्तीनंतर एक वर्षाच्या कालावधीऐवजी दि.१ जुलै रोजी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झाल्यानंतर पहिली वेतनवाढ अनुज्ञेय राहील.

Also watch 

2 - वेतनवाढ निश्चिती 3 %

3 - असाधारण रजा वार्षिक वेतनवाढ 

Post a Comment

5 Comments

  1. निलंबित कर्मचाऱ्यांना वेतनवाढ कधी मिळते

    ReplyDelete
  2. चटोपाध्याय वेतनश्रेणी किती पगारवाढ होते

    ReplyDelete
  3. सातवा वेतन आयोग मध्ये साधारणता ७०० रु बेसिक वाढ होते.

    ReplyDelete
  4. प्रसूती रजेवर असतांना 1 जुलै ला लागू होणारी वेतनवाढ लागू होते का होत असल्यास शासन निर्णय मिळावा

    ReplyDelete
  5. अनुदानित संस्थेचा सर्व सदस्य ने राजीनामे दिले आहेत संस्था धर्माद्य कायेलयास जीविंत आहे त्या संस्थेचा शाळेच्या मुख्याधापक ला वार्षिक वेतनवाढ देण्याचे अधिकार कोणाला आहे असा शासन निर्णय पाठवा

    ReplyDelete

close