डॉ. राजेश जोशी, नेत्रतज्ज्ञ
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे-जे महत्त्वाचे आहे, त्यात डोळ्यांचे निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शाळा असो वा खेळाचे मैदान, दृष्टी व्यवस्थित असेल तरच यश मिळवता येईल. अलीकडेच झालेल्या एका पाहणीनुसार, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये चारपैकी एका विद्यार्थ्याला डोळ्याची कुठली ना कुठली समस्या आढळली आहे. ही धोक्याची घंटा आहे, त्यामुळे छोट्यांचे डोळे निरोगी राहावे यासाठी गरज असेल तर त्यांना मोठ्यांनी डोळे दाखवण्याची म्हणजे रागवण्याची तयारी ठेवावी लागेल!
पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचे आणि आजचे वातावरण यांत खूप फरक आहे. तेव्हा घरोघरी टीव्ही, मोबाइल नव्हते. त्यामुळे डोळे उघडे असताना जे काही डोळ्याना दिसते ते पाहणे आणि वाचनाच्यावेळी पुस्तकात पाहणे, साधारण हीच डोळ्यांची कामे होती. आज वातावरण पूर्णत: बदलले आहे आणि टीव्ही, मोबाइल हे मुलांच्या नजरेचे शत्रू ठरू पाहात आहेत. या नव्या उपक्रमांनी डोळ्यांवरील ताण वाढवला आहे.
अनेकदा मुले टीव्ही अगदी जवळून पाहतात किंवा वाचताना पुस्तक डोळ्याच्या अगदी जवळ धरतात. याचा डोळ्यावर ताण पडतो. असे वांरवार घडू लागले की मग डोळे खाजवतात. त्यातून पाणी येऊ लागते. थोड्या प्रकाशाचा डोळ्यांना त्रास होतो. डोळे लवकर थकतात मग डोकेदुखीसारखे आजार उद्भवतात. आपल्या मुलांमध्ये ही लक्षणे दिसत असतील तर तातडीने नेत्रतज्ज्ञाशी संपर्क साधला पाहिजे. या समस्यांमुळे दृष्टिदोष निर्माण झाला तर चष्म्याद्वारे दूर करता येऊ शकतो.
अनेकदा लहान मुलांमध्ये दोन्ही डोळे एका रेषेत असल्याचे आढळत नाही. त्यास आपण तिरळेपणा असेही म्हणतो. हा आजार डोळ्याचे स्नायू कमजोर झाल्यामुळे निर्माण होतो. अशा मुलांना शाळेत किंवा मित्रांमध्ये चिडवण्याचे प्रकार घडतात व त्यातून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. डोळ्यांना हा आजार असेल तर तो आपोआप कधीच बरा होणार नाही. त्यासाठी उपचार करून घ्यावेच लागतील. चष्मा, डोळ्याचे व्यायाम किंवा शस्त्रक्रिया याद्वारे यावर मात करता येते. मुलांना एका डोळ्याने कमी दिसत असेल तर स्वाभाविकपणे दुसऱ्या डोळ्यावर अतिरिक्त ताण येत असतो. याही प्रकारात निदान होऊन उपचारांची गरज असते. अनेकदा मुलांचे डोळे लाल दिसतात. कधी सकाळी उठताना डोळे एकमेकाला चिकटलेले असतात. असे प्रकार आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे गरजेचे आहे. असा त्रास असलेल्या रुग्णाचा रुमाल वेगळा ठेवावा, त्याचप्रमाणे डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे. लहान मुलांमध्ये अनेकदा अश्रू वाहून नेणारी नलिका ब्लॉक झालेली आढळते. हा प्रकार कधी जन्मत:च असतो तर कधी जन्मानंतर काही दिवसांनी पाहायला मिळतो. जसजशी चेहऱ्याची वाढ होते तशा या नलिका मोकळ्या होतात किंवा मग छोट्या शस्त्रक्रियेद्वारेही त्या मोकळ्या करता येऊ शकतात.
एकूण डोळा हा महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच डोळ्यांची काळजी घेतली तर डोळे नेहमी निरोगी राहतील.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट
0 Comments