म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा देणे, १ नोव्हेंबर २०१८चा निर्णय रद्द करणे, अशा प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्याने 'इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन'ने (आयईएसए) आज सोमवारी २५ फेब्रुवारीला राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये राज्यातील सुमारे पाच हजार शाळा, तर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील साधारण पाचशे शाळा बंद राहण्य़ाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील खासगी इंग्रजी शाळांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारकडून ठोस कारवाई न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते किंवा आश्वासने देण्यात येतात. त्यामुळे या शाळांची संघटना असणाऱ्या इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने आज, सोमवारी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने २०१२पासून शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा द्यावा. यासोबतच १ नोव्हेंबर २०१८चा निर्णय रद्द करावा, मोफत पुस्तके, बॅग, गणवेश आणि इतर साहित्य सरकारने उपलब्ध करून द्यावे, राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा लागू करण्यात यावा, १८ नोव्हेंबर २०१३च्या सरकार निर्णयात सुधारणा करण्यात यावी, शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी मुख्याध्यापकांऐवजी शालेय वाहतूक व्यवस्थापकावर सोपवावी, अशा मागण्यादेखील करण्यात आल्या आहेत. यासोबतच स्वयं अर्थसहाय्यित शाळांचा दर्जा वाढ होण्यासाठी तातडीने ऑनलाइन प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे, असे 'आयईएसए'चे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा आणि जागृती धर्माधिकारी यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारकडून बंद मागे घेण्यासाठी असोसिएशनसोबत चर्चा करण्यात आली. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने शाळा बंद राहणार आहेत.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments