*सातवा वेतन आयोगसंदर्भातील काही शंका निरसन*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*✍🏻सचिन ताटु✍🏻*
*मो क्र.९०९६९५९८९५*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार ०१/०१/२०१६ ते ३१/१२/२०१९ दरम्यान पदोन्नत झालेले किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी लागलेले शिक्षक विकल्पाबाबतीत फार संभ्रमात आहेत.त्यासाठी श्री सचिन ताटु,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना बुलडाणा यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने अधिसू्चनेनुसार पुढीलप्रमाणे शंका निरसन केलेल्या आहेत*
*कृपया सदर पोष्ट जशीच्या तशी फॉरवर्ड करावी,नाव बदलुन कुणीही फॉरवर्ड करु नये*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*ज्यांना ०२/०१/२०१६ ते ३०/०१/२०१९ दोन्ही तारखांसहीत या दरम्यान वरिष्ठ वेतन श्रेणी लागत असेल त्यांच्यासाठी*
*स्पष्टीकरण :*
*समजा शिक्षक श्री सचिन ताटु यांना २३/०२/२०१६ रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झालेली असेल (ग्रेड वेतन २८०० मधुन ४२००) तर त्यांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निच्चिती पुढिलप्रमाणे होइल*
*१)*
*जर विकल्प ०१/०१/२०१६ दिला तर*
*०१/०१/२०१६ चे मुळ वेतन*
*१२०६० + २८०० = १४८६०*
*१४८६० × २.५७ = ३८१९०*
*सातव्या वेतन आयोगाच्या ग्रेड वेतन २८०० च्या समकक्ष पे मॅट्रिक्स S-10 मध्ये ३८१९० किंवा त्यालगतची पुढील सेलमधिल रक्कम =३९२००*
*०१/०१/२०१६ रोजीचे नवीन बेसिक ३९२००*
*आता २३/०२/२०१६ रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी लागु म्हणजे एक वेतनवाढ द्यावी आणि वेतनवाढ दिल्यानंतरची रक्कम ग्रेड वेतन ४२०० च्या समकक्ष S-13 मध्ये जेथे असेल तेथे किंवा त्यापुढील रक्कम घ्यावी*
*२३/०२/२०१६ रोजीचे पदोन्नतीपुर्विचे बेसिक = ३९२००*
*एक वेतनवाढ दिल्यानंतरचे बेसिक ४०४००*
*परंतु ४०४०० ही रक्कम S-13 मध्ये नसल्याने त्यापुढील म्हणजेच ४११०० हे नविन बेसिक राहील*
*२३/०२/२०१६ रोजीचे नविन बेसिक ४११००*
*पुढील वेतनवाढ आता ०१/०१/२०१७ रोजी होइल त्यानुसार पुढची बेसिक खालीलप्रमाणे*
*०१/०१/२०१७ = ४२३००*
*०१/०१/२०१८ = ४३६००*
*०१/०१/२०१९ = ४४९००*
*हा झाला हिशोब जर तुम्ही विकल्प ०१/०१/२०१६ चा दिला तर*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
*पदोन्नतीच्या पुढील वेतनवाढीच्या दिवशीचा विकल्प दिल्यास म्हणजेच ०१/०७/२०१६ चा विकल्प दिल्यास वेतननिच्चीती पुढीलप्रमाणे होइल*
*२३/०२/२०१६ चे अगोदरचे बेसिक १२०६०+२८०० = १४८६०*
*१४८६० × २.५७ = ३८१९०*
*ग्रेड वेतन २८०० च्या समकक्ष लेवल S-१० मधील ३८१९० किंवा त्यापुढील रक्कम ३९२००*
*S-13 मध्ये ३९२०० किंवा त्यालगतची पुढची सेल ३९९००*
*(२३/०२/२०१६ ते ३०/०६/२०१६ पर्यंतचे तात्पुरते बेसिक)*
*पुढील वेतनवाढिच्या दिवशिचा विकल्प दिल्यामुळे ०१/०७/२०१६ रोजीचे बेसिक आता असे होइल*
*S-10 मधिल २३/०२/२०१६ चे वेतन ३९२००*
*आता पुढील वेतनवाढिच्या वेळी म्हणजे ०१/०७/२०१६ रोजी S-10 मध्ये २ वेतनवाढी द्याव्या लागतील*
*०१/०७/२०१६ रोजीचे वेतनवाढीपुर्विचे बेसिक* *=३९२००*
*वेतनवाढ १ =४०४००*
*वेतनवाढ २ = ४१६००*
*४१६०० S-13 मध्ये नाही म्हणुन त्यालगतची पुढची सेल म्हणजे ४२३००*
*आताचे बेसिक*
*०१/०७/२०१६ = ४२३००*
*०१/०७/२०१७ = ४३६००*
*०१/०७/२०१८ = ४४९००*
*०१/०१/२०१९ = ४४९००*
*मित्रांनो वरिलप्रमाणे विकल्प दिल्यास दोन्ही वेळेस ०१/०१/२०१९ चे बेसिक सारखेच येत आहे*
*म्हणुन एरियस न गमावता ०१/०१/२०१६ हाच विकल्प योग्य आहे*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*महत्वाचे*
*काही शिक्षकांनी ज्यांची पदोन्नती किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी ०१/०१/२०१६ नंतर झालेली आहे ४२०० ग्रेड पे लाऊन पे फिक्सेशन करुन घेउन मग सातव्या वेतन आयोगाचा विकल्प देण्याचा तक्ता तयार करुन पाठविलेला आहे,परंतु मित्रांनो त्यावर लक्ष देउ नका*
*कारण*
*सातव्या वेतन आयोगात ०१/०१/२०१६ नंतर पदोन्नती किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी लागलेल्या कर्मचाऱ्यांना दोनच विकल्प आहे*
*१)पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतन निच्चिती ज्यामध्ये सुद्धा ४२०० ग्रेडपेचा कुठलाच विचार होत नाही*
*आणि*
*२)पदोन्नतीनंतरच्या वेतनवाढीच्या दिनांकाचा विकल्प ज्यामध्ये सुद्धा ४२०० चा कुठलाच विचार होत नाही*
*या दोनपैकी पहिला विकल्प निवडला तर एक वेतनवाढ २३/०२/२०१६ ला मिळेल पुढची वेतनवाढ ०१/०१/२०१७ ला मिळेल*
*आणि*
*दुसरा विकल्प निवडला तर दोन्ही वेतनवाढी ०१/०७/२०१६ ला मिळेल*
*पुन्हा एकदा सांगतो ४२०० ग्रेड पे जर ०१/०१/२०१६ च्या अगोदर लागलेला असेल तरच त्याचा विचार होतो*
*०१/०१/२०१६ नंतर ४२०० ग्रेडपे लागलेल्यांना सातव्या वेतन आयोगाचे पे फिक्सेशनच्या वेळेस कोणताही विकल्प निवडला तरी अगोदरच्या बेसिकमध्ये ४२०० चा विचार होणार नाही*
*टिप: सदर पोष्ट श्री सचिन ताटु यांनी शासन अधिसुचनेचा अतिशय सखोल अभ्यास करुन केलेली असुन ज्यांना अजुनही शंका असेल त्यांनी अधिसुचनेचा सविस्तर अभ्यास करावा आणि मगच मत व्यक्त करावे*
*धन्यवाद*
*✍🏻सचिन ताटु✍🏻*
*जिल्हा प्रसिद्धी प्रमुख*
*महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना*
*जिल्हा शाखा बुलडाणा*
0 Comments