Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

व्हॉट्स अॅप ग्रुप-नवीन फीचर्स " तुमच्या परवानगी शिवाय ग्रुप मध्ये add करता येणार नाही"

अचानकपणे आपला नंबर कोणीही कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करतो. त्यामुळे अनेकदा मनस्ताप होतो. आता मात्र, व्हॉट्स अॅपने याला आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत. व्हॉट्स अॅप युजर्ससाठी नवे फीचर्स आणले आहे.
व्हॉट्स अॅपच्या या नव्या फीचर्समुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही.
हे फीचर कसे वापराल
> प्ले स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्स अॅप अपडेट करा
> व्हॉट्स अॅप सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटवर क्लिक करा
> अकाउंट्समध्ये जाऊन प्रायव्हसीवर क्लिक करा
> प्रायव्हसीवर ग्रुप्स या पर्यायावर क्लिक करा
> ग्रुपवर क्लिक केल्यानंतर एव्हरीवन, माय कॉन्टॅक्स आणि नोबडी असे तीन पर्याय दिसतील
- एव्हरीवन: तुम्हाला कोणीही ग्रुपमध्ये अॅड करावे असे वाटत असल्यास या पर्यायावर क्लिक करावे
- माय कॉन्टॅक्स : फक्त तुमच्या संपर्कातील, ओळखीच्या व्यक्तींनी ग्रुपमध्ये अॅड करावे असे वाटत असल्यास हा पर्याय स्वीकारावा
- नोबडी: तुम्हाला कोणीच ग्रुपमध्ये अॅड करू नये असे वाटत असल्यास हा पर्याय स्विकारावा

Post a Comment

0 Comments

close