Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*अध्यापनाची खरी पद्धत...*

*अध्यापनाची खरी पद्धत...*

_*(प्रत्येक शिक्षकाने अवश्य वाचावे...)*_

एकदा *शिक्षकांचे* असेच एक *प्रशिक्षण होते*. त्यात *एक निवृत्त शिक्षक* पण आले होते.

सर्वजन दिवसभर

*व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे?*

*स्पेलिंग पाठ करावेत की नाही?*

*कविता कशी शिकवायची?*

*अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे?*

याचा *काथ्याकूट करीत होतो*.

*संध्याकाळी ५ वाजले.* सर्वांना *जाण्याची घाई* होती.
सर्वजन *उठू लागताच* ते *निवृत्त शिक्षक बोलायला उठले* आणि म्हणाले, *_"मी फक्त ३ मिनीटे बोलणार आहे."_*

*वैतागाने* सारे खाली बसलो. ते शिक्षक म्हणाले,

_*"दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली*.
*मी एक छोटे उदाहरण* सांगतो. ते जर *तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल."*_

*'आता आणखी काय उपदेश ऐकायचा' अशा भावनेने सर्व ऐकू लागले...*

ते म्हणाले की,

_*"एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे* तिथे एक , नवरा बायको राहतात. त्यांना *एक ६ महिन्याचं मूल आहे*. *आजूबाजूला एक ही घर नाही*. एकदा संध्याकाळी नवर्‍याला *अचानक गावाला जावे लागले*. पत्नी आणि मूल एकटेच आहेत. रात्री दोघे झोपले आणि *अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले*._

_*ती आई काय करेल?*_

_सांगा ना काय करेल?_"

ते आम्हाला विचारू लागले.

आम्ही सारे शांत झालो.                

कुणीच काही बोलेना.

ते शिक्षक पुन्हा आम्हाला विचारू लागले, 

_*"ती आई बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहील का?*

*की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहील?"*_

_"सांगा ना... काय करेल यातलं?"_

आम्हाला मुद्दा कळला होता.

ते *किंचित हसले* आणि पुढे म्हणाले,

_*"ती यातले काहीच करणार नाही*
. *ती तिला जे सुचेल ते करील*. ती त्याला *कडेवर घेईल. छातीशी कवटाळेल...  त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल, त्याच्यापुढे नाचून दाखवील, गाणी म्हणेल, त्याला दूध पाजील, त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविल. हे सारं सारं ती तिथपर्यंत करील की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही."*_

ते पुढे म्हणाले की,

_*"हे सारे ती का करील?"*_

_"हे तिला सारे का सुचेल?"_

*_"कारण ते तिचे मूल आहे म्हणून...!!!"_*

त्या शिक्षकांनी क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले,

_"त्या बाईसारखे *तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का?* *तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल* तर माझ्या मित्रांनो, *तुम्ही जे काही वर्गात कराल*, तेच *उपक्रम* असतील, *तीच अध्यापनाची पद्धती असेल*. तुम्ही *हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल* आणि *तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल."*_

_*"यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते...!"*_

आणि *ते शिक्षक शांतपणे खाली  बसले.*

*आम्ही थक्क झालो...*

*सुन्न झालो...!*

*सूचना* :-  हीपोस्टआपल्या *परिचयातील सर्व शिक्षकांना पाठवा,* ही विनंती🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments

close