Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*आईने मोजलेच नाही...*

👩 *आईने मोजलेच नाही...* 👵

🏵🦋आयुष्याच्या तव्यावरती
संसाराची पोळी
भाजता भाजता
हाताला किती बसले चटके
आईने मोजलेच नाही...
🖤
नवर्‍यासह लेकराबाळांचे
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले ,         
आईने                           मोजलेच नाही...
💚
जरा चुकले की
घरच्यांची, बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली ,   आईने                                  मोजलेच नाही...

याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी
किती जगले ,आईने
मोजलेच नाही...
💙
पाखरे गेली फारच दूर
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर ,आईने
मोजलेच नाही...🦋
🏵 *सर्व आईंना समर्पित...*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments

close