ग्रामपंचायतीने रस्ते, पाणी अशी कामं केलेली तर दिसतात, मात्र याव्यतिरिक्त काय कामं केली जातात, त्यासाठी किती निधी मिळतो, याची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध आहे.
14 व्या वित्त आयोग मार्फत गावाचा विकास आराखडा बनविण्यात आला होता. त्याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात येणारा निधी कसा खर्च करावा याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार गावातील शाळा व अंगणवाड्या यासाठी 25% रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे. उर्वरित रक्कम प्रत्येक विभागानुसार खर्च करण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे ५ वर्षात आपली ग्रामपंचायत कोणती कामे करणार आहे हे आपण घरबसल्या पाहू शकणार आहोत.
माहिती कशी मिळवाल?
येथे टच केल्यानंतर तुम्ही पंचायत राज मंत्रालयाच्या प्लॅन प्लस या वेबसाईटशी जोडले जाल.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा तपशील पाहिजे, ते वर्ष टाका.
राज्य निवडल्यानंतर तुम्हाला नेमकी कशाची माहिती निवडायची आहे, तो पर्याय निवडा, जसं की ग्रामपंचायतीची माहिती हवी असेल तर ग्रामपंचायत निवडा आणि जिल्हा परिषदेची माहिती पाहिजे असेल तर जिल्हा परिषद हा पर्याय निवडा.
यानंतर जिल्हा निवडा.
जिल्हा निवडल्यानंतर पुढे तालुका निवडावा लागेल.
तालुक्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीची यादी येईल. त्यातून तुमची ग्रामपंचायत / गाव निवडा.
गाव / ग्रामपंचायत निवडून गेट रिपोर्टवर क्लिक करा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
तुम्हांला तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व कामांची यादी प्राप्त होईल.
0 Comments