Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ख्रिसमस स्टिकर्स WhatsApp मध्ये कसे ॲड कराल? स्टिकर्स द्वारे मित्र-मैत्रिणींना अशा द्या ख्रिसमसच्या शुभेच्छा...

WhatsApp आपल्या युजर्स साठी अनेक नवनवीन फीचर्स उपलब्ध करत असते. WhatsApp कंपनीने आपल्या युजर्ससाठी खूप सारे स्टिकर्स पॅक्स ऑफर केले आहेत. परंतू विशिष्ट असे फेस्टिवल बेस्ड स्टिकर्स साठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप्सवर अवलंबून राहावे लागणार आहे. हे स्टिकर्स पॅक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आज आपण २५ डिसेंबर निमित्ताने  ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp स्टिकर्स चा वापर कसा करायचा ते पाहणार आहोत. ख्रिसमस सणानिमित्त तुम्हाला सुद्धा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा द्यायच्या असतील तर खास क्रिएटिव स्टिकर्स पाठवून त्यांना शुभेच्छा देवू शकता.

WhatsApp मध्ये असे ॲड करा ख्रिसमस स्टिकर्स

>> गूगल प्ले स्टोरवर जा आणि ख्रिसमस स्टिकर्स पॅक फार व्हॉट्सअॅप असे टाईप करा.
>> या ठिकाणी तुम्हाला खूप अॅप्स दिसतील. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कोणताही अॅप सिलेक्ट करू शकता. वेगवेगळे स्टिकर्स तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी ‘Christmas Stickers Pack 2020 – WAStickersApps' आणि ‘Christmas Stickers for WhatsApp (WaStickersApp)’ नावाच्या या अॅप्सना डाउनलोड करू शकता.
>> अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करा. या ठिकाणी तुम्हाला ख्रिसमस संबंधी खूप सारे स्टिकर्स दिसतील.
>> या स्टिकर्सला व्हॉट्सअॅपमध्ये अॅड करण्यासाठी तुम्हाला प्लसच्या '+' बटनावर टॅप करावे लागेल. हे स्टिकर्स विंडोच्या टॉप राइट कॉर्नरवर तुम्हाला मिळतील.
>> यानंतर एक छोटा बॉक्स दिसेल. यात लिहिलेले असेल की, तुम्ही याला व्हॉट्सअॅपमध्ये अॅड करू शकता. यानंतर तुम्हांला 'ADD'बटनावर प्रेस करावे लागेल.
>> यानंतर अॅड केलेले नवीन ख्रिसमस स्टिकर्स व्हॉट्सअॅपमध्ये नजर येतील. चेक करण्यासाठी तुम्ही केवळ त्या कॉन्टॅक्टचे चॅट ओपन करा. ज्यांना तुम्हाला स्टिकर्स पाठवायचे आहे.
>> या ठिकाणी तुम्हाला टायपिंग संबंधी स्माईली आयकॉनला प्रेस करावे लागेल. येथून स्टिकर्स सेक्शनमध्ये जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला नवीन ख्रिसमस स्टिकर्स पाठवण्यासाठी मिळतील.

Post a Comment

0 Comments

close