५वी ते ८वी शाळा सुरु करण्याबाबत शासन निर्णय जारी... शाळा सुरु करण्यासंदर्भातील सर्व शासन निर्णय डाउनलोड करा.
January 18, 2021
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ अंतर्गत ९ ते १२ वी च्या शाळा २३ नोव्हेंबर च्या परिपत्रकानुसार सुरु केल्या आहेत. या वर्गाची उपस्थिती सुद्धा हळूहळू वाढली असून कोरोनाचा प्रार्दुभाव सुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे शासनाच्या टप्प्या टप्प्या ने शाळा सुरु करण्याच्या धोरणानुसार ५वी ते ८वी च्या शाळा २७ जानेवारी पासून सुरु करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन शाळा सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली. यामध्ये शालेय आवारात मास्क चा वापर करणे, सोशल डिस्टंन्स पाळणे, नियमित स्वच्छता राखणे, यासारख्या विविध गोष्टीचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.
शाळा सुरु करत असताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील शासन निर्णय दि. १५ जून २०२०, दि.२९ ऑक्टोबर २०२०, दि. १० नोव्हेंबर २०२० रोजीच्या सूचना काळजीपूर्वक अभ्यासाव्यात.
2 Comments
मायापा मोहिते
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete